Murder
Murderesakal

Nashik Crime: खळबळजनक! सततच्या त्रासाला कंटाळून पित्यानेच सुपारी देवून मुलास धाडले यमसदनी

वणी : दारु पिऊन शिवीगाळ करुन पैशांची सतत मागणी करणाऱ्या मुलाची वडीलांनीच १८ हजार रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवुन आणल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असुन, या प्रकरणी वणी पोलिसांनी मयताच्या वडीलांसह तीन संशयीतांना ताब्यात घेतले असुन संशयीतांमध्ये एका विधीसंघर्षीत बालकाचा देखील समावेश आहे. (Tired of constant suffering father killed own drunkard son by giving contract at wani Nashik Crime)

वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ता. २२ नोव्हेंबर रोजी वणी पोलिस ठाणे हद्दीतील लोखंडेवाडी शिवारात, पालखेड धरणाच्या भराव परिसरात एक मृतदेह पडलेल्या असल्याची माहीती मिळाली होती.

दरम्याण प्राथमीक तपासात सदर मृतदेह किशोर उर्फ टिल्लु दगु उशीर (वय २६ वर्षे) रा. खडकजांब, ता. चांदवड याचा असल्याचे निष्पण्ण झाले होते.

सदर मृतदेहाच्या कपाळावर, डोक्यावर, चेहऱ्यावर, तोंडावर, डोळ्यांवर अज्ञात हत्याराने गंभीर वार करुन त्यास ठार केल्याप्रकरणी मयताचे दाजी सुरेश सुधाकर कांडेकर रा. खडकजांब, ता. चांदवड यांनी वणी पोलिसांत फिर्याद दिली होती.

याप्रकरणी निर्जनस्थळी खुन झाल्यामुळे कुठलाही साक्षीदार नसतांना तपास करणे पोलिसांसमोर आवाहन होते. परंतु गोपणीय व तांत्रीक दृष्ट्या तपास करत पोलिसांनी संशयीत संदीप छगन गायकवाड (वय ३०) व त्याचा साथीदार एक १६ वर्षीय विधीसंघर्षीत मुलास ताब्यात घेतले.

Murder
Nashik Crime: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी खुनाचा हेतू तपासणे कामी संदीप यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने दिलेल्या कबुली नुसार मयताचे वडील दगु जयराम उशीर (वय ५७) रा. खडकजांब ता. चांदवड यांना त्यांचा मयत मुलगा किशोर उर्फ (टिल्लु) हा दारु पिऊन सतत पैशाची मागणी करुन शिवीगाळ व दमदाटी करायचा म्हणुन त्या त्रासाला कंटाळुन त्याला जीवे मारण्याची रुपये १८ हजारांची सुपारी संशयीत आरोपी संदीप व त्याचा सहकारी असलेल्या विधीसंघर्षीत मुलास दिली होती.

यावरुनच दोन्ही संशयीतांनी किशोर उर्फ टिल्लुची हत्या केल्याचे कबुल केले. या माहिती वरुन पोलिसांनी मयताचे वडील दगु जयराम उशीर यांना आज ता. २७ रोजी ताब्यात घेतले असुन अधिक तपास चालु आहे.

तर संदीप यास ता. २८ पर्यंत पोलिस कोठडी असुन, विधीसंघर्षीत बालकास बालसुधार गृहात दाखल करण्यात आले आहे.

सदर तपासात पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधीक्षक अदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे सपोनि गणेश शिंदे व कर्मचारी तसेच वणी पोलिस ठाण्याचे सपोनि निलेश बोडखे व सहकारी यांनी परिश्रम घेतले.

Murder
Mumbai Crime: झटपट पैशांसाठी चोरांनी सतरा लाखांचा जेसीबी पळविला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com