कोथिंबीरचे दर घसरल्याने केरसाणेत एक एकरावर फिरवला रोटर

कोथिंबीरचे दर घसरल्याने केरसाणेत एक एकरावर फिरवला रोटर
Published on
15906 केरसाणे : कोथिंबीर पिकावर रोटर फिरविताना शेतकरी. ------ केरसाणेत एक एकर कोथिंबरवर फिरवला रोटर सकाळ वृत्तसेवा नरकोळ, ता.१७ : केरसाणे (ता.बागलाण) येथील शेतकरी रवींद्र अहिरे यांनी कोथिंबीरला दर मिळत नसल्यामुळे व केलेला खर्चही वसूल होणार नाही या धास्तीने एक एकर कोथिंबीर रोटर फिरवला. गेल्या महिनाभरापासून कोथिंबीरचा दर वधारला होता. ग्रामीण भागातील शहरी भागात सुद्धा सरासरी ५० रुपये पेंडीपर्यंत कोथिंबीरचा दर पोहोचला होता. परंतु, पंधरवड्यापासून कोथिंबीरची आवक वाढल्याने दर घसरला आहे. अहिरे यांनी एक एकरावर कोथिंबीरची लागवड केली होती. यासाठी ३० हजारांचा खर्च आला होता. कोथिंबीर लागण केल्यानंतर वेळाेवेळी औषध फवारणी केली. अचानक बाजारपेठेत आवक वाढल्याने कोथिंबीरचा दर एकदम घसरला. ५० रुपये जुडी असणारा दर अगदी २ रुपयावर आला. यामुळे गुंतवलेला पैसा वाया गेला. इतकेच नव्हे तर कोथिंबीर शेताच्या बाहेर काढणे सुद्धा त्यांना परवडत नसल्याने त्यांनी थेट ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपल्या प्लॉटवर रोटर फिरविला. केलेला खर्च वसूल होणार नाही, या उद्देशाने रोटर फिरविला. आता उन्हाळी कांदा लागवडीसाठी काम करणार आहे. - रवींद्र अहिरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com