सेकंड मेन
(पेट्रोलपंपाचे संग्रहित छायाचित्र वापरावे)
--
इंधन दरवाढ होताच महागाईचा भडका
(उपशीर्षक)
जळगावात पेट्रोल १०८, डिझेल ९५ रूपयांवर; सामान्यांना झळ
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : केंद्र सरकारने सर्वसामान्यांना पहाटे सहाला मोठा धक्का दिला. पेट्रोल- डिझेल दरवाढ जाहीर होताच शहरासह सर्वत्र महागाईचा भडका उडाला आहे. तेल कंपन्यांनी मध्यरात्री पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीबाबत इमेल करून माहिती दिली. यानंतर पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यानुसार जळगावात पेट्रोलचे दर १०८.६३ रूपये व डिझेल ९५.२३ रुपयांवर पोहोचले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि रुपयाची होत असलेली घसरण यामुळे केंद्र सरकारने आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची मोठी वाढ जाहीर केली आहे. दूध, सीएनजी दरवाढीनंतर पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्याने जीवनाश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची देखील शक्यता आहे. यात आज (ता.१५) पहाटे सहापासून पेट्रोल– डिझेलच्या दरवाढीचा निर्णय झाला असल्याने जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचे परिणाम दिसून येतील.
चार वर्षानंतर दरवाढ
एप्रिल २०२२ नंतर तेल कंपन्यांनी केलेली ही दरवाढ आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ चार वर्षांपूर्वी झाली होती. आजच्या दरवाढीनंतर देशातील विविध भागात पेट्रोल ३.१४ रुपये आणि डिझेलचा दर ३.११ रुपयांनी वाढला आहे. तर जळगावात पेट्रोल ३.१३ रुपयांनी महाग झाले असून, पेट्रोल १०८.६३ रूपये तर डिझेल ३.११ रुपयांनी वाढून ९५.२३ रूपयांवर पोहोचले आहे.
सामान्यांना झळ
गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. यात आता पेट्रोल व डिझेलमध्ये झालेल्या दरवाढीमुळे वाहनधारक, सर्वसामान्य नागरिक आणि वाहतूकदारांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. महागाईमुळे दरवाढ झाली असून, सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळे वाहनांचा वापर कमी होणे शक्य नाही. इंधन बचतीचे आवाहन पंतप्रधानांनी केले असून, आमदार– खासदारांनी त्यांच्या गाड्या कमी कराव्यात, अशी भावना वाहनधारकांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर व्यक्त केली आहे.
––
इन्फो
दैनंदिन वस्तूंच्या किमतीवर परिणाम?
आजपासून लागू झालेल्या इंधन दरवाढीचा परिणाम दैनंदिन जीवनावर देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रान्स्पोर्टला लागणारा खर्च वाढल्याने मालवाहतूक, भाजीपाला तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
–