इलेक्ट्रिक वाहनांची लाट;इलेक्ट्रिक वाहनांची लाट;

इलेक्ट्रिक वाहनांची लाट;इलेक्ट्रिक वाहनांची लाट;
Published on
टुडे १ साठी शहर जिल्हा मेन (इलेक्ट्रिक वाहनांचा दुचाकी, चारचाकीचे एआय चित्र वापरावे) -- लोगो : सकाळ विशेष (डेटाबेस स्टोरी, ग्राफ करावा) ---------------- पेट्रोल-डिझेलच्या दणक्याला ‘इलेक्ट्रिक’ उत्तर ई-वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ; राज्यात ९ लाख, जिल्ह्यात ३२ हजार ‘इव्ही’ वाहने देवीदास वाणी : सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) संख्या नऊ लाखांच्या पार गेली असून, शासकीय अनुदान, इंधन दरवाढ आणि सौर ऊर्जेमुळे मिळणाऱ्या शून्य वीज बिलामुळे नागरिक ई-वाहनांकडे वेगाने वळत आहेत. वाढत्या मागणीमुळे काही वाहनांसाठी ‘वेटिंग लिस्ट’ देखील आहे. चार्जिंग सुविधा सहज उपलब्ध झाल्यास ही पर्यावरणपूरक इ-वाहनांची संख्या आणखी वाढू शकते, असे चित्र आहे. वाढत्या मागणीमुळे स्थानिक ऑटोमोबाईल बाजारात सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला असून, शोरूम्समध्ये गाड्या बुक करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी रस्त्यावर इलेक्ट्रिक वाहन दिसणेही दुर्मिळ होते. आज मात्र शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत इलेक्ट्रिक दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहने स्वीकारणाऱ्या अग्रगण्य राज्यांपैकी एक बनला आहे. इंधन बचत किती? उपलब्ध आकडेवारी आणि वाहनांच्या सरासरी वापराचा विचार केल्यास महाराष्ट्रातील विद्यमान इलेक्ट्रिक वाहनांमुळे दरवर्षी अंदाजे ८० कोटी लिटर पेट्रोल-डिझेलची बचत होत असावी. ही बचत हजारो कोटी रुपयांच्या इंधन आयातीवर परिणाम करणारी आहे. भविष्यात पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग, बॅटरी स्वॅपिंग, कॅफे आणि इतर सेवा केंद्रे वाढू शकतात. तरीही पंपांवर गर्दी? दरवर्षी लाखो पारंपरिक वाहनांची भर पडत असल्याने पेट्रोलपंपांवर गर्दी होते. ट्रक, बस आणि शेतीची मोठी व्यावसायिक वाहने अजूनही डिझेलवरच चालतात. ग्रामीण भागात चार्जिंग सुविधांच्या कमतरतेमुळे इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार मर्यादित आहे. परिणामी, वाढता दैनंदिन प्रवास आणि मालवाहतुकीमुळे पेट्रोल-डिझेलची मागणी आणि पंपांवरील गर्दी सतत वाढत आहे. जळगाव जिल्ह्याचे चित्र जळगाव जिल्ह्यातही इलेक्ट्रिक दुचाकी आणि रिक्षांची संख्या वाढत आहे. शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभे राहत आहेत. मात्र शेती, वाहतूक आणि ग्रामीण प्रवासासाठी अजूनही डिझेल व पेट्रोल वाहनांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते. कोट इलेक्ट्रिक वाहनांमुळे इंधन बचत निश्चित होत आहे. मात्र महाराष्ट्रातील वाढती वाहनसंख्या, मालवाहतूक आणि ग्रामीण भागातील परिस्थिती पाहता पेट्रोल-डिझेलची मागणी अजूनही मजबूत आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि पारंपरिक इंधन यांचे सहअस्तित्व, असे चित्र दिसून येत आहे. - ऋषिकेष चव्हाण, पेट्रोल पंपचालक. --------- आकडे बोलतात.. पेट्रोल, डिझेलची वाहने - राज्यातील वाहने : ५ कोटी २८ लाख - दुचाकी वाहने : ३ कोटी ७८ लाख - आटोरिक्षा : १२ लाख ९६ हजार - ट्रॅक्टर : १५ लाख ९३ हजार - बस : २ लाख १ हजार - रुग्णवाहिका : २६ हजार ------- राज्यातील इलेक्ट्रिक वाहने एकूण ‘इव्ही’ वाहने : ९ लाख ३७ हजार दुचाकी वाहने : ६ ते ७ लाख कार : १ ते १ लाख ३० हजार रिक्षा : १ लाख २ हजार ते १ लाख ५ हजार इलेक्ट्रिक बस : १० ते २० हजार -- जळगाव जिल्ह्यातील इलेक्ट्रिक वाहने एकूण ‘इव्ही’ वाहने : ३२ ते ३५ हजार दुचाकी : २२ ते ३० हजार चारचाकी : २ ते ४ हजार रिक्षा : १५०० ते ३ हजार बस, मालवाहू : १०० ते ३०० -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com