कापसाला मिळणार कापसाला मिळणार

कापसाला मिळणार  कापसाला मिळणार
Published on
टुडे पान एकसाठी मेनफिचर ---------------------- लोगो : सकाळ विशेष ----------------- (फोटो येणार आहे) --------------- कापसाला मिळणार ८,६०० रुपये हमीभाव -------- यंदा २० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता; शेतकरी, जिनिंगचालकांचे भवितव्य पावसावर अवलंबून सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : केंद्र शासनाने यंदा आठ हजार ६०० रुपये हमीभाव कापसाला दिला आहे. असे असले तरी बागायती कापूस पेरणी सोडली, तर कोरडवाहू कापूस पेरण्यांना अद्याप सुरूवात झाली नाही. कारण जून महिना पूर्ण होत आला तरी अद्याप दमदार पाऊस झाला नाही. जर पाच जुलैपर्यंत कोरडवाहू पेरण्या झाल्या तरच ऑक्टोबरला कापूस हातात येईल, अन शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ घेता येईल. दुसरीकडे पावसाअभावी कापसाच्या उत्पादनात १० ते २० टक्के घट येण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे २०२५-२६च्या खरीप हंगामात कापसाचे झालेले कमी उत्पादन, व्यापाऱ्यांकडून मिळणारा कमीभाव आदी कारणांमुळे बाजारात कमी प्रमाणात कापूस विक्रीस आला. सीसीआय व खासगी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कापसातून २० लाख कापूस गाठींऐवजी केवळ आठ लाख ५० हजारच गाठींची निर्मिती झाली. कापूस नसल्याने जीनिंग प्रेसिंग उद्योग संकटात आले होते. दरवर्षी ३७५ कोटींची होणारी उलाढाल, दोनशे ते सव्वादोनशे कोटी एवढीच राहिली. हंगामानंतर नऊ हजार भाव गतवर्षी केंद्र शासनाचा कापसाला हमीभाव आठ हजार १०० रुपये होता. मात्र, ज्या कापसाला माइच्शचरचे प्रमाण अधिक होते, तो कमी भावाने खरेदी केला. खासगी व्यापाऱ्यांनी कापसाच्या दर्जानुसार ७,६०० ते ७,७०० रुपये असा दर कापसाला दिला होता. मात्र, कापूसच बाजारात हवा त्या प्रमाणात न आल्याने आणि केंद्र शासनाने कापसाची आयात थांबविल्याने भारतातील कापसाला मोठी मागणी आहे. त्यावेळी नऊ हजार ते नऊ हजार ५०० रुपयांचा भाव कापसाला मिळाला. मात्र, मे महिन्यात कापूसच शिल्लक नव्हता. भाव अधिक मिळूनही शेतकऱ्यांना लाभ झाला नाही. ---- दमदार पावसाची प्रतीक्षा यंदा आठ हजार ६०० रुपये हमीभाव कापसाला आहे. मात्र, आजअखेर केवळ १२ टक्के पाऊस झाला. कोरडवाहू शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतिक्षेत पेरण्या केल्या नाहीत. जर कोरडवाहू शेतात ५ जूलैपर्यंत कापूस पेरला गेला तरच ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये कापसाचे पीक चांगले येईल. बागायतदारांनी २५ मेस पेरणी केल्याने त्यांची पिके उगवली आहेत. त्यांचा हंगाम विजयादशमीच्या मुहूर्तावर हातात येईल. शेतीचे सर्व गणित पावसावर अवलंबून आहे. शेतीवरच शेतकरी, कृषी बाजारपेठा व सर्वच बाबी अवलंबून आहेत. यासाठी आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. -------- ------------ काही वर्षातील कापूस गाठींची निर्मिती अशी वर्ष--उद्दिष्ट-- प्रत्यक्षात उत्पादन २०१५-१६-- १५ लाख गाठी-- १५ लाख ५० हजार २०१६-१७--१५ लाख--- १४ लाख ३४ हजार २०१७-१८--१५ लाख--१६ लाख ६० हजार २०१८-१९-- १६ लाख-- १४ लाख ३५ हजार २०१९-२०-- १५ लाख-- १३ लाख ७० हजार २०२०-२१--१५ लाख-- ११ लाख २०२१-२२-- १५ लाख-- ७ लाख २०२२-२३--२५ लाख--१९ लाख २०२३-२४--२२ लाख--१५ लाख २०२४-२५--१५ लाख--९ लाख २०२५-२०२६--८ लाख ५० हजार २०२६-२७--१५ लाख (लक्ष्यांक) ------------ कोट कापसाचे गणित पावसावर अवलंबून आहे. बागायती कापूस चांगला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत. पाच जुलैपर्यंत कापसाच्या पेरण्या पूर्ण झाल्यानंतर चांगला कापूस हातात येईल. यंदा हमीभाव ८,५०० रुपये आहे. शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा आहे. - प्रदीप जैन अध्यक्ष, खानदेश जीनिंग मिल ओनर्स असोसिएशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com