आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात महाराष्ट्राच्या नेमबाजांचा सहभाग

आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात महाराष्ट्राच्या नेमबाजांचा सहभाग
Published on
बातमी आजच वापरावी –––– NSK26H22422 (दीक्षांत जाधव) जळगावचे दीक्षांत जाधव भारतीय संघाचे प्रशिक्षक ------- आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : भारतीय क्रीडा प्राधिकरण व राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जर्मनीतील सुहल येथे आयोजित आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्‍पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात महाराष्‍ट्रातील नेमबाजांचा सहभाग असून, जळगावातील दीक्षांत जाधव यांची निवड झाली आहे. आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्‍पर्धा १४ ते २६ जूनदरम्यान होत आहे. या स्पर्धेसाठी केंद्र सरकारने ८४ खेळाडू, १७ प्रशिक्षक व ५ सपोर्ट स्टाफ सदस्यांच्या भारतीय पथकास मान्यता दिली आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी निवड झालेल्या भारतीय संघात महाराष्ट्रातील अनेक गुणवान नेमबाजांनी स्थान मिळवून राज्याचा गौरव वाढवला आहे. प्रशिक्षकांच्या यादीत महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक व खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुलाच्या रायफल व पिस्तोल अकॅडमीचे समन्वयक दीक्षांत संजय जाधव यांची निवड झाली आहे. ते भारतीय संघासोबत प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणार आहेत. भारतीय संघाच्या प्रशिक्षक मंडळात निवड झाल्याबद्दल दीक्षांत जाधव यांचे खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील व ‘केसीई’चे संचालक, मूळजी जेठा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. डॉ. रणजित पाटील आदींनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com