मनपा महासभा

मनपा महासभा
Published on
धुळे टुडे २ साठी मेन... --- फोटो- NSK26H22426, NSK26H22428 धुळे : महापालिका महासभेत बोलताना महापौर मायादेवी परदेशी. शेजारी ज्योत्स्ना पाटील, नितीन कापडणीस, मनोज वाघ. दुसऱ्या छायाचित्रात एका विषयावरुन आमने- सामने आलेले सत्ताधारी- विरोधी नगरसेवक. --- विरोधक नडले; सत्ताधारी भडकले --- मनपा महासभेतील चित्र; सत्ताधारी-विरोधक आमने-सामने; आयुक्तांवरील टिकेचेही पडसाद सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २४ : शहरातील नालेसफाईप्रश्नी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आयुक्तांवर केलेल्या टिकेचे पडसाद बुधवारी (ता. २४) महापालिकेच्या महासभेत उमटले. सत्ताधारी भाजप पदाधिकारी, नगरसेवकांनी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांना उद्देशून उलट- सुलट शब्दांचा वापर करत निषेध केला. तसेच, सभागृहातील विरोधकांनीही एका विषयावर विरोध केल्याने सत्ताधाऱ्यांचा पारा चढला, त्यातून सत्ताधारी- विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. तर अन्य एका विषयावरुन सत्ताधारी नगरसेवक व आयुक्तांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. --- महापालिकेची सर्वसाधारण महासभा सकाळी अकराला महापालिकेतील स्व. अटल बिहारी वाजपेयी सभागृहात झाली. महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभीच भाजपच्या गटनेत्या किरण कुलेवार यांनी कुणाचे नाव न घेता आयुक्तांना शिविगाळ केल्याचा मुद्दा उपस्थित करत निषेध नोंदविला. अशा प्रकारचे शब्द वापरणे लोकशाही, संविधानाचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले. याच विषयावर नगरसेवक ललित माळी यांनीही नामोल्लेख टाळत त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यांचा एक सदस्य सभागृहात नाही, त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे, प्रशासनाने त्यांना एंटरटेन करु नये असे म्हणत निषेध केला. मात्र, त्यांचाही रोख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर होता. नगरसेवक रोहित चांदोडे यांनीही कुणाचे नाव न घेता आयुक्तांवर खालच्या दर्जाची टिका केली असे म्हणत त्यांचे घर काचेचे असल्याचे सांगितले. शेवटी महापौर श्रीमती परदेशी यांनी या विषयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ‘उबाठा-फिबाटा’ असे संबोधत टिका केली. यापुढे बरे- वाईट बोललात तर आम्ही महिला ढाल बनून सामना करु, असे म्हणत आयुक्तांना वापरलेल्या अपशब्दाबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांचा निषेध केला. सभागृहात गोंधळ मौजे धुळे येथील सर्व्हे क्रमांक ४९१/२, सर्व्हे क्रमांक ५०० मधून जाणाऱ्या १५.०० मीटर रुंद विकास योजना रस्ता वगळण्याचा विषय सभेपुढे होता. या विषयावर शिवसेनेचे नगरसेवक गणेश जाधव यांनी सिव्हील हॉस्पीटलकडे जाण्यासाठी हा सोयीस्कर रस्ता असल्याचे म्हणत संस्था महत्वाची की नागरिक असा प्रश्न करत रस्ता वगळू नये अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शाहबाज शाह यांनीही सिव्हीलकडे जायला हा एकमेव रस्ता आहे, ज्या संस्थेसाठी रस्ता वगळण्याचा विषय आहे त्या संस्थेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही संचालक असल्याचे ऐकिवात आहे, संबंधित संस्थेने तेथे उड्डाणपूल करावा, रुग्णांच्या जीवापेक्षा संस्था महत्वाची का असे म्हणत रस्ता वगळण्याच्या विषयाला विरोध असल्याचे सांगितले. तर भाजपचे नगरसेवक निलेश नेमाणे यांनी त्या भागात खदानी आहेत. त्यामुळे रस्ता वगळण्याचा विषय मंजूर करावा, अशी मागणी केली. दरम्यान, विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून या विषयाला विरोध होत असल्याचे व श्री. शाह यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव घेतल्याचा संदर्भ घेत सत्ताधाऱ्यांनी विरोधी सदस्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला, सत्ताधारी- विरोधी सदस्य एकमेकांसमोर आले. या गोंधळातच महापौर श्रीमती परदेशी यांनी विरोधी सदस्य श्री. शाह व श्री. जाधव यांना पुढील तीन सभांना बंदी घालत असल्याचे सांगितले व विषय मंजूर केला. जाधवांचा संताप स्वस्तिक चित्रमंदिराजवळील व्यापारी संकुलातील गाळ्यांना रेडीरेकनर दराने भाडे आकारण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजप नगरसेवक संजय जाधव यांनी या व्यापारी संकुलाची बांधकाम परवानगी आहे का, ते मनपा मालकीचे असेल तर त्याचा उतारा दाखवा, अशी मागणी केली. त्यावर प्रशासनाकडून लगेच माहिती देवू शकत नसल्याचे सांगण्यात आले. आयुक्त श्री. कापडणीस यांनी तुमचा काही आक्षेप असल्यास तो नोंदवा, आम्ही तपासणी करु, असे सांगितले. मात्र, श्री. जाधवांनी मुद्दा लावून धरल्याने आयुक्तांनी असे वन-टू-वन उत्तर देवू शकत नसल्याचे महापौरांना सांगितले. त्यावरुन नगरसेवक श्री. जाधवही संतप्त झाले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com