अभियांत्रिकीच्या पुर्वपरीक्षेच्या क्लास पडला महाग

अभियांत्रिकीच्या पुर्वपरीक्षेच्या क्लास पडला महाग
Published on
ऑनलाईन क्लासच्या नावे २२ लाख ७५ हजारांचा गंडा ----- भारतीय जवानाच्या पत्नीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२४ : मुलीला जेईई परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ऑनलाईन क्लासच्या नावे अगोदर एक लाख ४५ हजारांचा गंडा सायबर गुन्हेगारांनी घातला. मात्र, हे पैसे परत मिळवून देण्याच्या नावाखाली नंतर सायबर गुन्हेगारांनी महिलेकडून तब्बल २१ लाख ६५ हजार ६३७ रुपये उकळले. क्लासची फी व नंतर घेतलेली रक्कम, अशी एकूण २२ लाख ७५ हजार १३७ रुपयांत महिलेची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ऑक्टोबर २०२४ ते २ जून २०२६ दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बीएसएफमधील निवृत्त जवान विनोद राजाराम सोनार (रा. अमळनेर) यांच्या पत्नी ज्योती विनोद सोनार (वय ४१) मुलीला अभियांत्रिकी विद्याशाखा व ‘आयआयटी’साठी जेईई पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाईन क्लासच्या शोधात होते. जून २०२४ मध्ये त्यांच्याशी सचिन राठोड (रा. पुणे) याने संपर्क साधला व जेईई ऑनलाईन क्लासची माहिती दिली. त्यासाठी १ लाख ४५ हजार रुपये शुल्क असून, ४ हजार ६०० रुपयांप्रमाणे हप्त्याने पैसे भरावे लागतील, असेही सांगितले. त्यानुसार १२ जूनला महिलेकडून नोंदणी शुल्क म्हणून २० हजार रुपये यूपीआयद्वारे घेतले. २ जुलै २०२४ ला राठोडने पुस्तकांच्या नावाने ८ हजार रुपये घेतले. २९ ऑक्टोबर २०२४ ते १८ डिसेंबर २०२५ दरम्यान हप्ताहप्त्याने एकूण १ लाख ९ हजार ५०० रुपये ऑनलाईन स्वीकारले. मात्र, पुस्तकेही दिली नाही व क्लासही घेतले नाहीत. त्यानंतर संबंधितांशी महिलेने वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. गेलेले शुल्क दुप्पटचे आमिष क्लाससाठी भरलेली रक्कम गेल्यानंतर महिलेची मुलगी टेलिग्राम ॲपवरून माहिती घेत असताना, तिची गणेश (रा. दिल्ली) नावाच्या व्यक्तीशी बोलणे झाले. त्याला तिने घडलेला प्रकार सांगितला. ‘तुझे पैसे दुप्पट करून देईल’, अशी ग्वाही त्याने दिली. त्यासाठी त्याने वेगवेगळ्या कारणांनी महिलेकडून २ लाख ९३ हजार ९०० रुपये ऑनलाईन स्वीकारले. नंतर त्यानेही प्रतिसाद दिला नाही. तिसऱ्याकडून १८ लाखांचा गंडा त्याने त्याचा मित्र अनुज याच्या क्रमांकावरून केलेल्या मोबाईलवर महिलेने संपर्क साधला. त्याने दिल्ली सायबर क्राईममध्ये माझी ओळख असल्याचे सांगून सायबर अधिकारी प्रदीप कुमार मीना नावाच्या व्यक्तीशी बोलणे करून दिले. त्या अधिकाऱ्याने तक्रार नोंदणीसाठी २ हजार, बँक व्हेरिफिकेशनसाठी ४ हजार, विड्रॉल चार्जेससाठी ३० हजार, ट्रान्सफर प्रोसेसिंग फी म्हणून ७ हजार ३६६ घेतले. त्यानंतरही ३१ डिसेंबर २०२५ ते २ जून २०२६ दरम्यान १८ लाख ७१ हजार ७३७ रुपये घेतले. अखेर सायबर पोलिसांत धाव शुल्कची रक्कम व भरलेले पैसेही परत न मिळाल्याने ज्योती सोनार यांनी २३ जूनला सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सचिन राठोड, शरद पवार, गणेश, अनूज व प्रदीपकुमार मीना नावाच्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com