रस्ते खोदकामाला लगाम; आयुक्त जिवने यांचा दूरदृष्टीचा निर्णय

रस्ते खोदकामाला लगाम; आयुक्त जिवने यांचा दूरदृष्टीचा निर्णय
Published on
रस्ते खोदकामाला बसणार लगाम आयुक्तांचा दूरदृष्टीचा निर्णय; नवीन रस्त्यांखाली क्रॉसिंग पाइपची सक्ती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : महापालिकेच्या कामकाजाला अधिक गती, पारदर्शकता आणि गुणवत्ता देण्यासाठी आयुक्त आदित्य जिवने यांनी विविध स्तरांवर नियोजन सुरू केले आहे. प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यासाठी तांत्रिक साधने तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर विशेष भर दिला जात असून, शहर विकासाच्या कामांमध्येही दीर्घकालीन दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. शहरातील नवीन रस्ते बांधकामांबाबत आयुक्तांनी एक महत्त्वपूर्ण सूचना बांधकाम विभागाला दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. यात भविष्यात शहरात जेथे नवीन रस्ते तयार केले जातील, तेथे ठराविक अंतरावर रस्त्यांच्या खालून क्रॉसिंग पाइप टाकण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. या पाइपचा उपयोग भविष्यात पाणीपुरवठ्याच्या नळजोडण्या, भूमिगत गटार वाहिनी, गॅस वाहिनी, दूरसंचार केबल, इंटरनेट फायबर, वीज वायरिंग अथवा अन्य भूमिगत सुविधांसाठी करता येणार आहे. चौकट रस्ते खोदण्याची गरज नाही सध्या विविध कारणांसाठी वारंवार रस्ते खोदले जात असल्याने नव्याने तयार केलेल्या रस्त्यांचे नुकसान होते. यामुळे नागरिकांच्या कररुपी पैशांतून उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांचे आयुष्य कमी होते आणि वाहतुकीलाही अडथळे निर्माण होतात. क्रॉसिंग पाइपची व्यवस्था केल्यास भविष्यात रस्ते खोदण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, रस्त्यांचा दर्जा व टिकाऊपणा कायम राखण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com