राज्यातील रेशन दुकानदारांच्या

राज्यातील रेशन दुकानदारांच्या
Published on
NSK26H22537 जळगाव : ऑल इंडिया फेयर प्राइस ऑफ डीलर फेडरेशनचे नेते प्रल्हाद मोदी यांच्याशी चर्चा करताना हेमरत्न काळुंखे, किरण कोळी आदी. ---- राज्यातील रेशन दुकानदारांच्या मार्जिनचा प्रश्न अखेर सुटला --- मंत्री भुजबळ यांचे आश्वासन; रखडलेली रक्कम खात्यात जमा होणार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या कमिशनमुळे (मार्जिन) आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील रेशन दुकानदारांना अखेर मोठा दिलासा मिळाला असून, ऑल इंडिया फेअर प्राईस डीलर्स फेडरेशनचे नेते प्रल्हाद मोदी यांच्या मध्यस्थीनंतर दुकानदारांच्या खात्यात मार्जिनची रक्कम लवकरात लवकर जमा करण्याचे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू तथा ऑल इंडिया फेयर प्राईस ऑफ डीलर फेडरेशनचे नेते प्रल्हाद मोदी जळगाव दौऱ्यावर आले होते. त्यांना जळगाव रेशन दुकानदारांनी मार्जिन व इतर समस्या सांगितल्या. अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. मोदी यांच्याशी रेशन दुकानदारांच्या महाराष्ट्रातील सद्यस्थितीबाबत व परवानाधारकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. तीन महिन्यांच्या धान्य वाटपासंदर्भातील माहिती दिली. श्री. मोदी यांनी तत्काळ राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्याशी चर्चा केली. मंत्री भुजबळ यांनी धान्य वाटपासाठी मुदतवाढ ३० तारखेपर्यंत देण्याचे मान्य केले असून, मार्जिनची रक्कम दुकानदारांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांना दिले आहे. स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारक महासंघाचे हेमरत्न हेमंत काळुंखे, किरण कोळी, नरेंद्र पाटील, जयदीप शहा, दिगंबर मोरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com