टुडे ३ ॲंकर
----
(एनआयईचा लोगो वापरावा)
---
शाडूच्या गणेशमूर्ती महा-कार्यशाळेला उदंड प्रतिसाद
ऐतिहासिक विक्रमाचा भाग होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता
सकाळ वृत्तसेवा
जळगाव : ‘सकाळ-एनआयई’ आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३ हजार विद्यार्थ्यांच्या भव्य शाडू माती गणेशमूर्ती महा-कार्यशाळेला शहर व परिसरातील शाळांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ''द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स''मध्ये नोंदविल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक विक्रमाचा भाग होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.
हा अनोखा उपक्रम रविवारी (ता. ६ ) सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत ला. ना. हायस्कूल, स्टेट बँकेसमोर, जळगाव येथे पार पडणार आहे. एकाच छताखाली तब्बल तीन हजार विद्यार्थी स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारणार असून, हीच मूर्ती आगामी गणेशोत्सवात आपल्या घरी स्थापन करणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच निसर्गप्रेम निर्माण व्हावे, पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचावा आणि भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
विद्यार्थ्यांनी सोबत आणावयाचे साहित्य
पाण्यासाठी मग, कॉटनचे कापड किंवा फडके, मातीकामासाठी लाकडी अथवा प्लास्टिकची साधने, खराब झालेले पेन-पेन्सिल, लहान पट्टी, ब्रश, जाड दोरा, झाडूच्या काड्या इत्यादी, तयार झालेली गणेशमूर्ती सुरक्षितपणे घरी नेण्यासाठी लाकडी पाट
आजच आपली जागा निश्चित करा
कार्यक्रमाचे नियोजन आणि मर्यादित जागा लक्षात घेता, इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित आपली नावनोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नावनोंदणीसाठी संपर्क
प्रकल्पप्रमुख : दिनेश थोरात : ९८५०६०३५९०
‘सकाळ-एनआयई’ समन्वयक : आशुतोष पाटील - ८६६९७११०४९
नवीन स्थळ : ला. ना. हायस्कूल, स्टेट बँकेसमोर, जळगाव
रविवार, ६ सप्टेंबर
सकाळी ८ ते ११
३,००० विद्यार्थी- एक भव्य पर्यावरणपूरक विक्रम