NSK26H28445
जळगाव : नॅशनल ॲबेकस वैदिक मॅथ स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या मेघा पालवे.
----------
ॲबेकस मॅथ स्पर्धेत
नऊ विद्यार्थ्यांचे यश
----
मेघा पालवे यांना उत्कृष्ट शिक्षिकेचा पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१ : आराध्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित सोळाव्या नॅशनल ॲबेकस वैदिक मॅथ स्पर्धेत द्रोपदीनगरातील मेघा पालवे यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले. रविवारी(ता.३०) झालेल्या या स्पर्धेत नऊ विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून आपल्या गुणवत्तेची छाप पाडली.
या स्पर्धेत ओजस्विनी मराठे, प्रियांश बाविस्कर, आदिती बाविस्कर, शिवम सोनवणे, आरजू पिंजारी, तमन्ना पिंजारी, इशान इंगळे, श्रीराज जाधव व परीक्षित पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास हरीभक्त पारायण पंडित डॉ. मनोज महाराज, सी. विजयदत्त निकम व योगेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी समर्थसिंग पाटील होते. संस्थेचे उपाध्यक्ष नीलेश मोरे व सचिव सीमा एस. पाटील यांचीही उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मार्गदर्शक मेघा पालवे यांना उत्कृष्ट शिक्षिका व बेस्ट सेंटर अवार्ड देऊन गौरविण्यात आले. ॲबेकस व वैदिक गणिताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांत वेगवान गणना, अचूकता, एकाग्रता, तर्कशक्ती व आत्मविश्वास विकसित करण्यासाठी पालवे सातत्याने प्रयत्नशील आहेत.