राहुल गांधींचा दौरा; कडेकोट बंदोबस्त

राहुल गांधींचा दौरा; कडेकोट बंदोबस्त
Published on
राहुल गांधी आज नाशिकमध्ये; दौऱ्याबाबत कमालीची गोपनीयता एमटीडीसी रिसोर्टवर ‘संघटन सृजन अभियाना’च्या शिबिराचा समारोप सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील ‘संघटन सृजन’ प्रशिक्षण शिबिराच्या समारोपासाठी काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बुधवारी (ता. २) नाशिकमध्ये येणार आहेत. गंगापूर धरणालगतच्या ग्रेपपार्क रिसॉर्ट, एमटीडीसी येथे सकाळी ११ ते दुपारी ४, या वेळेत ते शिबिरात सहभागी प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार व जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करणार आहेत. गांधी यांच्या दौऱ्याबाबत गुप्तचर यंत्रणेसह शहर व ग्रामीण पोलिसांकडून कमालीची गोपनीयता राखली जात असून, कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर ‘संघटन सृजन’ प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रात ‘एसआयआर’ प्रक्रिया सुरू असल्यामुळे या प्रशिक्षण शिबिराला उशिरा सुरुवात झाली. गेल्या दहा दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या या शिबिरात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह खासदार, आमदार व जिल्हाध्यक्ष सहभागी झाले आहेत. त्यांनी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले, तसेच स्व-अनुभवांच्या आधारे विविध घटकांशी चर्चा केली. शिबिराच्या समारोपानिमित्त राहुल गांधी बुधवारी तब्बल चार तास नाशिकमध्ये उपस्थित राहणार आहेत. सकाळी आठला दिल्ली विमानतळावरून ते नाशिककडे रवाना होतील. साधारण दहाला ओझर विमानतळावर पोहोचल्यानंतर मोटारीने ते गंगापूर धरणालगतच्या ग्रेपपार्क रिसॉर्ट, एमटीडीसी येथे दाखल होतील. सकाळी ११ ला शिबिरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनास सुरुवात होईल. दुपारी चारला ते पुन्हा दिल्लीकडे रवाना होतील. दौऱ्याबाबत कमालीची गोपनीयता राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून गुप्तचर यंत्रणांची पथके नाशिकमध्ये दाखल झाली असून, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. ओझर विमानतळापासून गंगापूर धरणालगतच्या एमटीडीसी रिसॉर्टपर्यंतच्या त्यांच्या प्रवासमार्गाबाबतही कमालीची गुप्तता पाळली जात आहे. असे असले तरी शहर व ग्रामीण पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक विमला एम. यांच्यासह उपविभागीय अधिकारी एमटीडीसी रिसॉर्टवर उपस्थित राहून बंदोबस्ताचा आढावा घेत आहेत. ...असा आहे बंदोबस्त पोलिस अधीक्षक- १ अपर पोलिस अधीक्षक- १ उपविभागीय अधिकारी- ५ पोलिस निरीक्षक- १४ सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक- २० पोलिस अंमलदार- २९० आरसीपी-२ प्लाटून - ओझर विमानतळावर अतिरिक्त बंदोबस्त - शहरातील मार्गावर शहर पोलिसांचा बंदोबस्त आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ भेटण्याची शक्यता शहरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी यांच्या शहरातील भेटीची शक्यता कमी असल्याने आंदोलकांचे शिष्टमंडळच एमटीडीसी रिसॉर्टवर जाऊन राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिबिराच्या ठिकाणी पक्षाच्या कार्यक्रमासोबतच या संभाव्य भेटीकडेही लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com