मेन
लोगो : आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन
--
लोगो : सकाळ विशेष
---
फोटो : H28950, 51,52
नाशिक : शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि रस्त्यांवरील धूळ गोळा करण्यासाठी डस्ट कलेक्टर मशिन्सचा वापर सुरू करण्यात आला आहे. (छायाचित्र : विकी कदम )
---
‘डस्ट कलेक्टर’ द्वारे ९९ टक्के प्रदूषक घटक नष्ट
वायुप्रदूषण रोखण्यासाठी होणार मदत; १५ ठिकाणी बसणार यंत्र
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : शहरातील वाढत्या हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांना स्वच्छ व शुद्ध हवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. याअंतर्गत महापालिकेच्या पुढाकाराने व कंपन्यांच्या ‘सीएसआर’ निधीतून शहरात प्रायोगिक तत्त्वावर १५ महत्त्वाच्या ठिकाणी आधुनिक ‘डस्ट कलेक्टर’ यंत्रे बसविली जाणार आहेत. यापैकी काही ठिकाणी हे यंत्र बसविण्यात आले आहेत.
या उपक्रमांतर्गत ‘वारो- सी६’ (मॉडेल : एसटीआर-१०१) हे पेटंट-प्राप्त आणि पूर्णपणे फिल्टरलेस कार्बन संकलित करणारे उपकरण रस्त्यांवरील पथदिव्यांवर बसवले जाणार आहे. २४ तास अविरत कार्यरत राहून हे यंत्र धूर व धुलीकणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करणार आहे. सध्या शहरात ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. सध्या पावसाळ्याच्या दिवसांमुळे या कामांच्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य आहे. परिणामी हवेतही धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. तसेच वाढत्या शहरीकरणामुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर डस्ट कलेक्टर मशिनच्या माध्यमातून हवेतील विषारी वायु तसेच धुलीकण शोषून घेत शहरवासीयांना स्वच्छ हवा उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे. काही दिवसांपूर्वी सिटी सेंटर मॉल परीसरातील पथदीपांवर हे यंत्र बसविण्यात आले असून, टप्याटप्प्याने आणखी काही ठिकाणी बसविले जाईल. साधारणतः तीन महिन्यांनंतर या उपकरणामुळे झालेल्या फायद्यांचे विश्लेषण करता येणार आहे.
---चौकट
कसे बसवले जाणार हे उपकरण?
रस्त्यावरील सुमारे ३० फूट उंच असलेल्या पथदिव्यांच्या खांबांवर हे यंत्र वाहतुकीच्या दिशेने ५.५ ते ६ फूट उंचीवर सुरक्षितपणे बसवले जाईल. वाहनांच्या सायलेन्सरमधून निघणारा धूर आणि रस्त्यावरून उडणारी धूळ थेट खेचून घेण्यासाठी ही उंची सर्वाधिक उपयुक्त ठरते. पथदिव्यांच्या वीज जोडणीशी हे थेट जोडता येईल.
---
प्रदूषणाच्या घटकांपासून
पेव्हर ब्लॉक, रंग निर्मिती
उपकरणाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे हवेतून जमा केलेल्या कार्बन आणि प्रदूषक घटकांपासून पेव्हर ब्लॉक्स किंवा औद्योगिक रंग तयार केले जाऊ शकतात. यामुळे केवळ प्रदूषण कमी न होता चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा हातभार लागणार आहे.
--------बुलेट
उपकरणाची वैशिष्ट्य़े
* फिल्टरलेस व सेल्फ- क्लीनिंग तंत्रज्ञानाचा यात वापर; यामुळे उपकरणासाठी वारंवार फिल्टर बदलण्याची गरज भासत नाही.
* स्वयंचलित ‘ऑटोमॅटिक वायपिंग ब्रश सिस्टिम’ मुळे देखभालीचा खर्च अत्यंत अल्प
* अतिसूक्ष्म कणांवर ९९.८ टक्के नियंत्रण मिळविणे शक्य; यंत्र हवेतील पीएम २.५, पीएच १.०, वाहनांचा काळा धूर आणि रस्त्यांवरील धूळ ९९.८ टक्क्यांपर्यंत शोषून घेण्यास सक्षम
* हे उपकरण २०० सीएफएम क्षमतेने काम करते, म्हणजेच दर तासाला सुमारे ३ लाख लिटर हवा शुद्ध करते
* हे यंत्र ‘एआय’ सक्षम असून, याद्वारे रिअल-टाइम हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण तसेच जीपीएस ट्रॅकिंग करता येते.
* उपकरण नेहमीच्या २३० व्हॅट वीजपुरवठ्यावर किंवा १२ व्हीडीसी सौर बॅटरी प्रणालीवरही चालवता येते.
* एबीएस पॉलिमरपासून बनवलेले उपकरण आयपी५५ प्रमाणित आहे.
* ‘अँटी-डस्ट कोटेड’ असल्यामुळे सर्व ऋतूंमध्ये ते सुरक्षित राहते.
- या यंत्राचे वजन अवघे १२ किलो आहे.
---