सोन्या-चांदीच्या
भावात घसरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ ः सुवर्ण बाजारातात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (ता. २१) भावात मोठी घसरण झाली होती. सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारीही (ता. २२) सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली. यामुळे दागिने खरेदीची संधी खरेदीदारांसाठी निर्माण झाली आहे.
चांदी तीन हजारांनी स्वस्त
सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याचा भाव एक लाख ५३ हजार रुपयांवर (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. त्यात हजार रुपयांची घसरण होऊन सोने एक लाख ५२ हजार रुपयांवर आले होते. मंगळवारी (ता. २२) पुन्हा एक हजार रुपयांची घसरण होऊन सोन्याचे भाव एक लाख ५१ हजार रुपयांवर आले आहेत. चांदीत तीन हजार रुपयांची घसरण होऊन चांदी दोन लाख ३५ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या बदलाचा परिणाम सोन्या-चांदीच्या बाजारात होत असल्याचे चित्र आहे. सुवर्ण बाजारात सातत्याने सुरू असलेला चढ-उतार कायम आहे. गेल्या आठवड्यात भावात काहीशी वाढ झाली होती. दरम्यान, पुढील आठवड्यात पितृपक्ष सुरू होत आहे. यामुळे दागिन्यांची फारशी खरेदी होत नाही. यामुळे भाव कमी होत असल्याचे चित्र दर वर्षी पाहावयास मिळते. यापूर्वीच सलग दोन दिवसांपासून भाव कमी होऊ लागले आहेत.
---
चौकट
सोन्या-चांदीचे भाव (विनाजीएसटी)
तारीख--- सोने (प्रतिदहा ग्रॅम)--- चांदी (प्रतिकिलो)
१६ सप्टेंबर--- १ लाख ५१ हजार ५००--- २ लाख ३४ हजार
१७ सप्टेंबर--- १ लाख ५० हजार ५००--- २ लाख ३२ हजार
१८ सप्टेंबर--- १ लाख ५२ हजार ५००--- २ लाख ४१ हजार
१९ सप्टेंबर--- १ लाख ५३ हजार--- २ लाख ४१ हजार
२१ सप्टेंबर--- १ लाख ५२ हजार--- २ लाख ३८ हजार
२२ सप्टेंबर--- १ लाख ५१ हजार--- २ लाख ३५ हजार