VNI26B12860
ओझरखेड ः ग्रामपंचायतीच्या पडीक गायरान जागेत तरुणांच्या सहकार्याने पाचशे केशर आंब्यांची लागवड करताना सरपंच गंगाधर निखाडे सह गावातील तरुण.
-----------------
३६-२
पाचशे केशर आंब्यांची
ओझरखेड येथे लागवड
----------------
पर्यावरण संवर्धनासोबतच रोजगारालाही चालना
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.३१ ः ओझरखेड ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनासोबत गावाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तब्बल ५०० केशर आंब्यांच्या रोपांची लागवड केली आहे. ''झाडे लावा, झाडे जगवा'' ही संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थ व तरुणांकडून स्वागत होत आहे.
हवामान बदल आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांच्या संवर्धनासाठी नियमित पाणी व सुरक्षेचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे. पडीक गायरान जागेत लावलेल्या या फळझाडांमुळे भविष्यात हिरवाई वाढण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगार व आर्थिक उलाढालीला गती मिळणार आहे. सरपंच गंगाधर निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि तरुणांच्या सहभागातून हा उपक्रम पार पडला.
------------
कोट
पर्यावरण संवर्धन आणि गावाचा आर्थिक विकास या दोन्ही गोष्टी साधण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. यातून स्थानिकांना रोजगार मिळून ग्रामपंचायतीचे उत्पन्नही वाढेल. ओझरखेडचे नाव राज्य पातळीवर पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.
- गंगाधर निखाडे, सरपंच, ओझरखेड.
------