esakal | महाराष्ट्राची फॉग सिटी 'इगतपुरी'! भावली धरण, धनुष्यतीर्थ, कावनाई पर्यटकांचे आकर्षण
sakal

बोलून बातमी शोधा

igatpuri

महाराष्ट्राची फॉग सिटी 'इगतपुरी'! पर्यटकांचे आकर्षण

sakal_logo
By
गौरव परदेशी

खेडभैरव (जि.नाशिक) : इगतपुरीला महाराष्ट्राची चेरापुंजी, पर्यटननगरी, फॉग सिटी तसेच जवळच्या भंडारदरा आणि कळसूबाई शिखरामुळे पर्यटनपंढरी म्हणून ओळखले जाते. भंडारदरा-कळसूबाई जरी दुसऱ्या जिल्ह्यात असले, तरी अवघ्या पन्नास किलोमीटरवर सह्याद्री पर्वतरांग जोडल्याने सौंदर्यात भर पडली आहे.

इगतपुरीतील भावली धरण, धनुष्यतीर्थ, कावनाई पर्यटकांचे आकर्षण

इगतपुरीतील भावली धरण, धबधबा, अशोका धबधबा, धनुष्यतीर्थ, कावनई किल्ला, कुरुंग किल्ला तसेच भंडारदरा -कळसूबाई क्षेत्रातील रंधाफॉल, सांधन व्हॅली, अंब्रेला फॉल, पांजरा फॉल, नानी फॉल, नेकलेस फॉल असे अनेक धबधबे, डोंगरदऱ्यांमधील छोट्या-मोठ्या नद्या, नाले मुसळधारेमुळे ओसंडू लागल्याने परिसरातील नारिकांना ते आकर्षित करत आहेत. दरवर्षी त्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येत असतात. त्यामुळे इगतपुरी तालुक्यासह भंडारदरा परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतो. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी दर वर्षीपेक्षा पर्यटकांची रेलचेल कमी आहे. भातशेती फुलल्याने सौदर्यात भर पडत असून, इगतपुरी आणि कळसूबाई परिसरात भातशेतीयोग्य मुसळधार पडल्याने भातशेती फुलून हिरवीगार झाल्याने परिसर आकर्षित झाला आहे.

व्यावसायिकांना व्यवसाय सुरळीत होण्याची अपेक्षा

दोन वर्षांपासून पर्यटन व्यवसायाचे मोठे नुकसान झाले असून, सध्याही पर्यटकांची रेलचेल कमी असल्याने हॉटेल, लॉजिंग, घरगुती गावरान खानावळी, गाइड्स, हातविक्री करणारे आदी व्यावसायिकांना अद्यापही हवा तितका व्यवसाय होत नाही. मुसळधार पाऊस व निसर्ग हिरवाईने नटल्याने यापुढे पर्यटन व्यवसाय सुरळीत होईल, अशी अपेक्षा येथील व्यावसायिकांना आहे.

हेही वाचा: नाशिक : गोदावरीला पूर; आपत्ती निवारण विभाग अलर्टवर

परिसरात मुसळधार पाऊस बरसत असून, येथील नदी-नाले-डोंगरावरील धबधबे वाहत आहेत. तसेच भातशेती फुलून गेल्याने येथील निसर्गाने हिरवेगार सुंदर रूप धारण केले आहे. हा निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही दर वर्षी या कालावधीत येथे येत असतो.

- अमोल आव्हाड, पर्यटक

हेही वाचा: बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा सुरगाणा पोलिसांकडून पर्दाफाश!

loading image
go to top