Nashik News : काट्या मारूती चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच

Katya Maruti Chowk
Katya Maruti Chowk esakal

पंचवटी : पंचवटीतील काट्या मारुती चौकात वाहतूक कोंडी नित्याची बाब झालेली आहे. सिग्नल यंत्रणा नावाला असून नेहमीच बंद असते.

हा चौक म्हणजे चारही बाजूंनी वाहनांचा मुक्त संचार असून पादचाऱ्यांसह वाहनचालकांना रस्ता ओलांडताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सिग्नल कार्यान्वित करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांकडून होत आहे. (Traffic congestion at Panchvati Katya Maruti Chowk is a regular occurrence traffic signal not working nashik news)

Katya Maruti Chowk
Nashik crime News : त्यांना तत्काळ अटक करा, अन्यथा...; मयत शिंदेच्या पत्नीचा पोलीस अधीक्षकांना इशारा

काट्या मारुती चौक परिसर हा अत्यंत वर्दळीचा परिसर आहे. या चौकातून मुंबई- आग्रा महामार्ग, औरंगाबाद रोड, तपोवन, तसेच पंचवटीत जातो. भक्त भाविकांची देखील या मार्गाहून वर्दळ असते.

तसेच या भागात शाळा कॉलेजची संख्यादेखील अधिक आहे. परिणामी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची येथे कायमच मोठी वर्दळ असते. मात्र, येथे चोहोबाजूंनी एकाच वेळी येणाऱ्या वाहनांमुळे रस्ता क्रॉस करताना विद्यार्थी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय या रस्त्याच्या लगतच पेट्रोलपंप आहे. त्यामुळे तेथे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांमुळेदेखील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो.

वाहतुक नियम धाब्यावर

निमाणी बसस्थानकदेखील या मार्गावर आहे. त्यामुळे सिटी लिंक बसेसचीही कायम वर्दळ असते. या परिसरातून पंचमुखी हनुमान मंदिरासमोरील रस्ता मुंबई-आग्रा महामार्गाला जोडतो. मोठ्याप्रमाणात नागरिक या मार्गाचा वापर करतात. शिवाय हा मार्ग वन वे असूनदेखील वाहनचालक चुकीच्या मार्गाने वाहतूक करतात. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून मार्गक्रमण होत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Katya Maruti Chowk
Nashik News : कलगी-तुरा मधील ‘झिलक्या’ पात्र साकारणारे यशवंत बाबा; वयाच्या सत्तरीत आवाज खणखणीत!

"काट्या मारुती चौकात बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा वाहनचालकांना दिसेल अशी असावी. त्यानुसार योग्य नियोजन करून ती कार्यान्वित करण्यात यावी. तसेच, हिरावाडी परिसर हा विकसित होत असून रिंग रोडमुळे या रस्त्याचा वापर वाढला आहे. काळानुसार या ठिकाणी छोटेखानी उड्डाण पुल होणे देखील गरजेचे आहे."

-सागर दिघे, सामाजिक कार्यकर्ता

"येथील वाहतूक कोंडी ही नित्याची असून, या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत असतात. त्यासाठी लागलीच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. पंचमुखी हनुमान मंदीराकडून एकतर्फी वाहतूक व्हावी. असे केल्यास नक्कीच वाहतूक कोंडी कमी होऊन अपघाताचे प्रमाण देखील घटेल."

-किरण पानकर, कार्याध्यक्ष, पंचवटी युवक विकास समिती

Katya Maruti Chowk
Sports News : वृषाली भोयेच्या धारधार आक्रमणाच्या जोरावर महाराष्ट्राच्या मुली अंतिम फेरीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com