नाशिक : मनमाडकरांना वाहतूक कोंडीचे ग्रहण!

Traffic-jam
Traffic-jamesakal

मनमाड (जि. नाशिक) : चांदवड - नांदगाव मार्गाचे काम सुरू असल्याने पुणे - इंदूर राष्ट्रीय महामार्गावर रोजच वाहतूक कोंडी (traffic jam) होत असून, नागरीकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. दोन दोन तास रांग हटत नसल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मालेगाव चौफुलीवर वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

रुग्णवाहिकांना वाहतूक कोंडीचा फटका

चांदवड ते नांदगाव मार्गाच्या दुपदरीकरण व काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. नांदगाव मार्गाचे काम सुरू झाले नसले तरी चांदवड मार्गाचे काम मालेगाव चौफुलीपर्यंत आले आहे. सदर काम दुपदरी असले तरी एक पदरी काम होत असून, एका बाजूचाच मार्ग वाहतुकीसाठी ठेवण्यात आला आहे. या कामामुळे चांदवड, नांदगाव आणि पुणे - इंदूर राष्ट्रीय महामार्गावर रोजच मोठी वाहतूक कोंडी होत असते. या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड अवजड वाहतूक होते. सतत वर्दळीचा मार्ग असल्याने या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. अगोदरच खड्ड्यांमुळे महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असताना वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक हैराण झाले आहेत.
अनेकदा गंभीर आजारी रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसतो. त्यामुळे रुग्णाच्या जीवावर देखील बेतण्याची शक्यता आहे. चांदवड मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची गर्दी होते. तर नांदगाव मार्गाने इंधन कंपन्यांचे टँकर ये - जा करीत असल्याने मोठी गर्दी असते. परिणामी, वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होतो.

Traffic-jam
आरोग्य विमा का महत्वाचा? त्याच्या प्रकारांची माहिती जाणून घ्या

पर्यायी मार्ग काढण्याची मागणी

पुणे - इंदूर महामार्गावरून जड, अवजड वाहनांची वाहतूक होत असते. या वाहतुकीत मध्येच येणाऱ्या वाहनांमुळे कोंडी निर्माण होते. त्यामुळे चारही मार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात. प्रवाशांचा या वाहतूक कोंडीत खोळंबा होतो. महामार्गावर आजपर्यंत अनेकांचे अपघात झाले आहेत. रोजचच्या कोंडीमुळे शहरातील नागरिकांसह वाहनधारकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. या कोंडीवर लवकरच मार्ग शोधला जावा आणि मालेगाव चौफुलीवर वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Traffic-jam
पुण्यात साडेसात हजार किलोमीटर लांबीच्या बेकायदा केबल्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com