Nashik : एकाचवेळच्या विवाह सोहळ्यांमुळे वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic Jam

Nashik : एकाचवेळच्या विवाह सोहळ्यांमुळे वाहतूक कोंडी

पालखेड (मिरचिचे) (जि. नाशिक) : निफाड- पिंपळगाव रोडवरील दावचवाडी येथे एकाचवेळी तीन विवाह सोहळे असल्याने सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (Traffic jam due to one time simultaneous wedding ceremonies Nashik News)

हेही वाचा: विद्यार्थी मिळण्यासाठी रस्सीखेच; पालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

शुक्रवारी (ता. २०) विवाह मुहूर्त मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे प्रत्येक सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी प्रत्येकाची धावपळ सुरू होती. निफाड- पिंपळगाव मार्गावरील दावचवाडीजवळील एका लॉन्सवरील विवाह सोहळ्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांचा फौजफाटा नसल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. त्यामुळे अनेकांना मन:स्ताप सहन करावा लागला. अनेकांना वेळेवर विवाह सोहळ्यांना पोहचता आले नाही. पोलिसांनाही तत्काळ पोहचणे शक्य नसल्याने बराच काळ वाहतूक कोंडी होती.

हेही वाचा: Nashik : शनिवारी, रविवारी वीज भरणा केंद्र सुरू राहणार

Web Title: Traffic Jam Due To 3 Simultaneous Wedding Ceremonies At One Time Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..