Traffic Signal Fine : सिग्नल्सवर बेशिस्तांचे फाटणार ‘चलान’! ‘सीसीटीव्ही’चा आजपासून वॉच

CCTV News
CCTV Newsesakal

Traffic Signal Fine : सिग्नल तोडताना आपल्याला कोणीही पाहत नाही वा त्याने काहीही फरक पडणार नाही असे वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात.

आता तुमच्यावर सिग्नलवरील सीसीटीव्हीचा वॉच असेल आणि नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला याच सीसीटीव्हीमुळे ई-चलनाद्वारे मोठ्या रकमेचा दंड आकारला जाऊन तसा संदेश तुमच्या मोबाईलवर येणार आहे. (Traffic Signal Fine Challan will be torn by unruly people on signals Watch CCTV from today by police department nashik news)

वाहतूक सिग्नलवर लाल दिवा असताना वाहनचालकाने हिरवा दिवा सुरू होईपर्यंत थांबणे आवश्‍यक आहे. सिग्नलवरचे पांढरे झेब्रा पट्ट्यांमागे वाहने थांबविली पाहिजे... असे एक ना अनेक वाहतूक नियम असताना बेशिस्त वाहनचालक मात्र बिनधास्तपणे या नियमांना फाट्यावर मारत सिग्नल तोडतात.

स्वत:चा तर जीव धोक्यात घालतातच, दुसऱ्याच्याही जिवाला धोका उत्पन्न करतात. परंतु आता सावधान, वाहतूक सिग्नलवर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून ते कार्यान्वितही झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे बेशिस्त वाहनचालकांना सोमवारपासून (ता. १) महागात पडणार आहे.

स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत नाशिक शहरातील वाहतूक सिग्नल्सवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. शहरातील सुमारे ८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, पहिल्या टप्प्यातील ४५ वाहतूक सिग्नलवरील सीसीटीव्ही महाराष्ट्र दिन अर्थात सोमवारपासून (ता. १) कार्यान्वित होत आहेत.

त्यामुळे यापुढे ज्या सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्या सिग्नलवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे वाहनचालकास आर्थिकदृष्ट्या महागात पडणार आहे.

CCTV News
Sinnar Market Committee Election : ‘त्या’ 8 संस्थांचा मुद्दाच सिन्नर बाजार समितीत निर्णायक! वाजे गटाला लाभ

सिग्नलवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जोडणी थेट पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाशी करण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीपासून ते बेशिस्तांवर पोलिस नियंत्रण कक्षातून करडी नजर ठेवता येणे शक्य होणार आहे.

पोलिस आयुक्तालयातील वाहतूक शाखेचे कार्यालय पुन्हा शरणपूर रोडवरील जुन्या जागेत स्थलांतरित करण्यात आलेले आहे. येथे आपत्कालीन प्रतिसाद केंद्रही सुरू करण्यात आलेले असून, गंगापूर रोडवरील आयुक्तालयाच्या सुसज्ज नियंत्रण कक्षात ‘कमांड कंट्रोल रूम’ कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

अनेक वर्षांपासून या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हींचा फीड मिळण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे पोलिसांना एकाच ठिकाणी बसून शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवता येणार आहे.

वाहतुकीचा खोळंबा झाल्यास काही क्षणात त्यांना त्यावर तोडगा काढता येणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे, शहरातील गुन्ह्यांसह गुन्हेगारांच्या हालचालींवरही पोलिसांना याद्वारे करडी नजर ठेवता येणे शक्य होणार आहे.

असे आहे नियंत्रण कक्ष

गंगापूर रोडवरील आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षामध्ये ६ बाय ४ फुटाची एलसीडी वॉल उभारण्यात आलेली आहे. याठिकाणी १६ डबल पॅनलचे मॉनिटर आहेत. त्यावर शहरात ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या ४५ सिग्नलच्या सीसीटीव्हींचे चित्रीकरण नियंत्रण कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना बघता येते.

तसेच, गूगल मॅपद्वारे सिग्नल्स व वाहतूक कोंडीचे थेट क्षणाक्षणाची माहितीही दृश्‍य स्वरुपात दिसणार आहे. सिग्नल तोडणारे, झेब्रा क्रॉसिंग, यू-टर्न घेणाऱ्यांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही यामुळे लक्ष ठेवता येणार आहे. तसेच, त्यावरून बेशिस्त वाहनचालकांना ई-चलानद्वारे दंड आकारला जाणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

CCTV News
Dhule Bazar Samiti Election Result : शिरपूरला अमरिशभाईंचाच करिष्मा! सर्व 18 जागांवर विजय

* एलसीडी वॉल : ६ बाय ४ फुटाची

* १६ डबर पॅनलचे मॉनिटर

* ४५ सिग्नल्सवर सीसीटीव्ही कॅमेरे

* सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्यास ई-चलनद्वारे दंड

* प्रस्तावित सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेरे : १ हजार

* लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे : ८००

* लावण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे : २००

* पहिल्या टप्प्यात सुरू : ४५

"पहिल्या टप्प्यात बसविण्यात आलेल्या मोजके ४५ सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेरे १ मेपासून कार्यान्वित होत आहेत. यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर नजर ठेवणे शक्य होईल. तसेच, वाहतूक कोंडीच्या ठिकाणी तत्काळ मार्ग काढणे सोपे होणार आहे. तरी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे."

- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

CCTV News
Mico Hospital: सातपूर मायको हॉस्पीटलमध्ये कुटूंबनियोजन शस्रक्रिया बंदच! कामगार महिलांची 2 वर्षांपासून गैरसोय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com