Nashik : उन्हाळाच्या सुट्टीमुळे रेल्वे गाड्यांना गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway station

Nashik : उन्हाळाच्या सुट्टीमुळे रेल्वे गाड्यांना गर्दी

नाशिकरोड : उन्हाळ्याच्या सुटीमुळे सध्या गर्दी वाढली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना जनरल तिकीट मिळत नसल्याने त्याचा गैरफायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळत आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर (Railway Station) टीसीची मर्यादित संख्या आणि प्रवाशांची वाढलेली गर्दी यामुळे फुकट्या प्रवाशांवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले आहे. तिकीट निरीक्षक (Ticket inspector) या फुकट प्रवाशांना शोधून दंडात्मक कारवाई करीत आहेत. (Train congestion due to summer vacation Nashik Summer News)

सध्या उन्हाळा (Summer) असल्याने विवाह समारंभ, सुटी व कौटुंबिक कार्यक्रमांमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली असून, सध्या नाशिकरोड रेल्वे स्थानकात गर्दी वाढली आहे. प्रवासी वाढल्याने तिकीट बुकिंग फूल झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना आरक्षण (Reservation) मिळत नाही. अनेक लोक विनातिकीट प्रवास करीत असल्याचे आढळून येत आहे. नाशिक रोड फलाट एकवरच तिकीट तपासणी होत आहे. फुकटे प्रवासी छुप्या मार्गाने रेल्वे स्थानकाबाहेर पडत आहेत. रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात मोहीम आखली असली तरी मनुष्यबळ कमी पडत आहे.

हेही वाचा: 40 हजारावर प्रॉपटी करपट्टी विना; करवसुलीसाठी 3 महिन्याचा अल्टिमेटम

लांब पल्ल्याच्या गाड्यांना जनरल तिकीट आणि आरक्षण मिळत नाहीत. त्यामुळे काही प्रवाशांना फुकट प्रवास करण्याची वेळ येत आहे. त्याच तिकीट निरीक्षकाने पकडल्यास जादा पैसे मोजावे लागत आहेत. तरी प्रशासनाने जनरल तिकीट सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. फक्त पंचवटी, राज्यराणी, गोदावरी या गाड्यांना जनरल तिकीट सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

हेही वाचा: नाशिक : ग्रामीण भागात भूगर्भातील जल पातळी वाढविणार

Web Title: Train Congestion Due To Summer Vacation Nashik Summer News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top