esakal | नाशिक जिल्ह्यातील १३ उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीवर बदल्या

बोलून बातमी शोधा

Maharashtra Police
नाशिक जिल्ह्यातील १३ उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीवर बदल्या
sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : राज्यात ५३९ उपनिरीक्षकांना सहाय्यक निरीक्षकपदी बढती देत त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक शहर तसेच ग्रामीण भागातील १३ जणांचा यात समावेश आहे.

बढती तूर्तास तात्पुरत्या स्वरूपात

ही बढती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून शासनाच्या १७ डिसेंबरच्या आदेशानुसार व तूर्तास तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच या केवळ खुल्या गटातील पदोन्नत्या असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: नाशिककरांना उन्हाळ्यात पाण्याबाबत नो टेन्शन!

या बदल्यांमध्ये नाशिक शहरातील सहा, तर नाशिक ग्रामीण पोलिस दलातील सात अशा १३ उपनिरीक्षकांचा समावेश आहे. यातील चौघांची नाशिक आयुक्तालयातून नाशिक परिक्षेत्रात बदली झाली आहे. नऊ जणांची इतर जिल्ह्यांत बदली झाली आहे. नाशिक आयुक्तालय तसेच परिक्षेत्रात इतर जिल्ह्यांतून १३ उपनिरीक्षक येणार आहेत. यात सर्वाधिक आठ मुंबईतून, तर उर्वरित जळगाव, नगर व औरंगाबाद जिल्ह्यांतून येणार आहेत.