esakal | जिल्हा परिषदेतर्फे शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने; वर्ग तीन-चारच्या 200 बदल्या शक्य
sakal

बोलून बातमी शोधा

teachers

जिल्हा परिषदेतर्फे शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : ग्रामविकास विभागाने बुधवारी (ता.१४) प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या वर्ग तीन आणि चारमधून वगळून ऑनलाइन पद्धतीने करण्यासंबंधी कळवले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेतर्फे शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने होतील. याशिवाय वर्ग तीन आणि चारच्या प्रशासकीय व विनंती अशा २०० बदल्या होण्याची शक्यता आहे. (Transfer-of-teachers-online-by-Zilla-Parishad-marathi-news-jpd93)

वर्ग तीन-चारच्या २०० बदल्या शक्य

सामान्य प्रशासन विभागातर्फे जिल्हा परिषदेतर्फे ग्रामविकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे बदल्यांची प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत करण्यासाठी माहितीचे संकलन केले जात आहे. त्यातूनच प्रशासकीय आणि विनंती बदल्या नेमक्या किती होतील, याची चित्र स्पष्ट होईल. ही प्रक्रिया या आठवड्याच्या अखेरपर्यंत अपेक्षित आहे. अलिकडच्या काळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या हा वादाचा विषय झाला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाप्रमाणे सामान्य प्रशासनाला ऑनलाइन पद्धतीने बदल्या करताना वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल, असे दिसते. याशिवाय वर्ग एक आणि दोनच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्यस्तरावरून होणार असल्याने कोणाच्या बदल्या होणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: लग्नपत्रिकेवरून 'लव्ह जिहाद'चा आरोप; लग्न मोडण्याची वेळ

हेही वाचा: गाडीच्या बोनेटवर चढला मोठा साप; तरीही तब्बल 2 किमीचा प्रवास

loading image