तोतया तृतीयपंथींपासून खरे तृतीयपंथी झाले त्रस्त; समाजाची प्रतिमा खराब होत असल्याचा आरोप  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

transgender.jpg

 तोतया तृतीयपंथींपासून सामान्य नागरिक त्रस्त असताना आता स्वतः तृतीयपंथीनाही अशा तोतया तृतीयपंथींपासून त्रास होत आहे. नाशिक जिल्ह्यात तोतया तृतीयपंथीय लोकांकडून जनसामान्य व व्यावसायिकांच्या लुटमारीच्या व चोरीच्या घटना घडत आहेत.

तोतया तृतीयपंथींपासून खरे तृतीयपंथी झाले त्रस्त; समाजाची प्रतिमा खराब होत असल्याचा आरोप 

sakal_logo
By
दिगंबर पाटोळे

वणी (नाशिक) : तोतया तृतीयपंथींपासून सामान्य नागरिक त्रस्त असताना आता स्वतः तृतीयपंथीनाही अशा तोतया तृतीयपंथींपासून त्रास होत आहे. नाशिक जिल्ह्यात तोतया तृतीयपंथीय लोकांकडून जनसामान्य व व्यावसायिकांच्या लुटमारीच्या व चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे खऱ्या तृतीयपंथीय (किन्नर) समाजाची प्रतिमा खराब होत असल्याने तोतयांवर कडक कारवाईची मागणी मानवता किन्नर समाज संस्थेचे अध्यक्ष सलमा गुरुनायक यांनी वणी पोलिसांत निवेदनाद्वारे केली.

समाजाची प्रतिमा खराब होत असल्याचा आरोप

नागरिकांत तोतया किन्नरांमुळे घबराटीचे, दहशतीचे वातावरण निर्माण होत असून, खऱ्या किन्नर समाजाची बदनामी होऊन जनसामान्यात किन्नरांची प्रतिमा खराब होत असल्याचे म्हटले आहे. याबाबतचे निवेदन वणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांना सारिकागुरू, दीपागुरू, शुभांगी, हेमा, रविना, अंकिता, ऊर्मिला, मानवता संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड. इकबाल खान आदींनी दिले.

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

loading image
go to top