esakal | धक्कादायक! संशय आल्याने पोलीसांनी 'अत्यावश्यक सेवेचा' ट्रक अडवला...अन् तपासले तेव्हा धक्काच!

बोलून बातमी शोधा

truck 1.jpg

नाशिक-पुणे महामार्गावर वावी- नांदूरशिंगोटे शिवारात नाकाबंदी सुरू असताना संगमनेरकडून नाशिककडे जाणारा टाटा मालट्रक (एमएच 03, सीव्ही 4749) वावी पोलिसांनी तपासणीकरिता अडविला. या वेळी मालट्रकवर भाजीपाल्याकरिता परवानगी होती आणि मालट्रकवर अत्यावश्‍यक सेवेचा कागदही चिकटविण्यात आला होता. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता,...

धक्कादायक! संशय आल्याने पोलीसांनी 'अत्यावश्यक सेवेचा' ट्रक अडवला...अन् तपासले तेव्हा धक्काच!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / वावी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केवळ अत्यावश्‍यक सेवेकरिता काही वाहनांना परवानगी देण्यात आलेली आहे. भाजीपाल्याकरिता परवानगी मिळालेली असताना देखील अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली काहीतरी भलताच प्रकार उघड झाल्याने पोलीसांनीही कारवाई केली आहे.

असा घडला प्रकार.. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता,
नाशिक-पुणे महामार्गावर वावी- नांदूरशिंगोटे शिवारात नाकाबंदी सुरू असताना संगमनेरकडून नाशिककडे जाणारा टाटा मालट्रक (एमएच 03, सीव्ही 4749) वावी पोलिसांनी तपासणीकरिता अडविला. या वेळी मालट्रकवर भाजीपाल्याकरिता परवानगी होती आणि मालट्रकवर अत्यावश्‍यक सेवेचा कागदही चिकटविण्यात आला होता. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता, पाठीमागे कोबीच्या भरलेल्या प्लॅस्टिक जाळीचा एक थर होता मात्र कोबीच्या गोण्यामागे दहा हजार किलो मांस पोलिसांना मिळून आले. अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली मालट्रकमधून अवैधरित्या मांसची वाहतूक सुरू असल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी मालट्रकचालक महोम्मद युनूस याकूब कुरेशी (वय 42) आणि महेश कुमार शर्मा (वय 26, रा. कुर्ला, कुरेशीनगर, मुंबई) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा > मुलाला उच्चशिक्षित करण्याची 'त्यांची' इच्छा अपूर्णच...काळ असा आला की...मुलगाच  

वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबईकडे मांस घेऊन जाणारा मालट्रक वावी पोलिसांनी पकडून त्यातून दहा हजार किलो मांस आणि ट्रक, असा वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

हेही वाचा > कर्जाच्या बोजाखाली 'त्याचा' जीव गुदमरला..अखेर तरुण शेतकऱ्याने शेवटचा निर्णय घेतला
.