Nashik Crime News : परराज्यातील मद्यसाठ्याची चोरटी वाहतूक रोखली; लाखांचा ऐवज जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arrested

Nashik Crime News : परराज्यातील मद्यसाठ्याची चोरटी वाहतूक रोखली; लाखांचा ऐवज जप्त

वणी (जि. नाशिक) : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाने वणी - नाशिक रस्त्यावरील पिपंळनेर फाटयाजवळ परराज्यातील मद्यसाठयाची चोरटी वाहतूक करतांना सुमारे २ लाख ४९ हजार किमंतीच्या विदेशी मद्यासाह ९ लाख ४७ हजार ४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. (transportation of liquor stock from abroad seized by state excise department Seized instead of lakhs at pimpalner fata Nashik Crime News)

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कळवण विभाग यांना मिळालेल्या खबरीनुसार आयुक्त व अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शना खाली कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाने संयुक्तरित्या ता. १३ रोजी येथे दारुबंदी गुन्हयाकामी सापळा रचुन वाहन तपासणी करतांना एक सफेद रंगाची महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप क्रं. जी. जे., ०६, एक्स.एक्स. ५६६२ या वाहनामध्ये अंतर्गत बदल करुन चोरकप्पा बनवुन मद्याची अवैधरित्या वाहतुक करताना वाहनासह परराज्यातील विदेशी मद्यसाठा जप्त केला असुन वाहन चालक सुरेश कुमार रामलाल बिश्नोई यास अटक करण्यात आलेली आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

वेगवेगळ्या कंपनीचे विदेशी मद्याच्या दमन राज्यातील निर्मीत व दादरा नगर हवेली & दमन & दिव येथे विक्री करीता असलेेेेले सुमारे पंचवीस बॉक्स असा २ लाख ४९ हजाराचा मद्य ेसेच अॅड्राईड मोबाईल, महिंद्रा कंपनीच बोलेरो चारचाकी मालवाहतुक पिकअप वाहन असा एकुण ०९ लाख ४९ हजार ४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई निरीक्षक एस. के. सहस्त्रबुध्दे, दुय्यम निरीक्षक एम. बी. सोनार, एस. व्ही. देशमुख, जवान दिपक आव्हाड, विलास कुवर, एम.सी. सातपुते, पी. एम. वाईकर, व्ही. आर. सानप, गणेश शेवगे, सचिन पोरजे यांनी यशस्वीरित्या पार पाडला.