Tribal Cultural Festival : नाशिकमध्ये उद्यापासून आदिवासी सांस्कृतिक महोत्सव

Birsa Munda
Birsa Mundaesakal

नाशिक : नाशिकमध्ये मंगळवार (ता. १५)पासून भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील आदिवासी समुदायांच्या कला, संस्कृती, खाद्यपदार्थ, आदिवासींच्या योगदानाचे दर्शन घडविणारा राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव होणार आहे. आदिवासी संशोधन विभागाचे आयुक्त राजेंद्र भारुड, आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी ही माहिती दिली. (Tribal cultural festival from tomorrow in Nashik News)

Birsa Munda
Fake Medical Certificate Case : डॉ. सैंदाणे, डॉ. वास यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

महोत्सवाचे उद्‌घाटन १५ नोव्हेंबरला दुपारी दोनला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गोल्फ क्लब मैदानावर होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आदींच्या उपस्थितीत उद्‌घाटन होणार आहे.

महाराष्ट्रातील आदिवासी जमातीची पारंपरिक वेशभूषा व सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या आदिवासी पारंपरिक आदिवासी जीवन, कला व संस्कृती यावर आधारित आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे आदिवासी लघुपट महोत्सव १७ आणि १८ नोव्हेंबरला होणार आहे. महोत्सवासाठी ६५० कलाकार, आदिवासी नृत्य कलाकार, पंधरा हजार युवक व युवती भेट देतील.

महोत्सवाचे आकर्षण

आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात राज्यातील २१० आदिवासी हस्तकला स्टॉल, हस्तकला प्रदर्शन, ४२ नृत्यपथके, महिला बचतगट, आदिवासी खाद्यपदार्थ, रानभाज्या, दागदागिने, वारली चित्रकला, गोंडी चित्रकला, गवताच्या वस्तू, बांबूकाम, काष्टशिल्पे, धातूकाम, मातीकाम, पारंपरिक वनौषधी, लाकडी व लगद्याचे मुखवटे यांचे प्रदर्शन व विक्री हे खास आकर्षण असेल.

Birsa Munda
Cleanliness Drive : Smart City Company, NMC, नाशिक ब्लॉगर्स ग्रुपतर्फे स्वच्छता मोहीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com