Dinesh Bagul Bribe Case : लाचखोर अभियंत्याच्या घरातून दीड कोटी जप्त

Bribe Crime News
Bribe Crime Newsesakal

नाशिक : आदिवासी विकास विभागातील सार्वजनिक बांधकामाचा लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागूल यांच्या नाशिकमधील घरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रक्कमे व्यतिरिक्त ९८ लाख, तर पुण्यातील घरातूनही ४५ लाख रुपये अशी सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, बागूल यांना आज (ता.२६)न्यायालयात हजर केले असता रविवारपर्यंत (ता. २८) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. (Tribal department Engineer Dinesh Bagul Bribe Case one half crore seized from house Nashik Crime Latest Marathi News)

लाचखोर बागूल यांच्याकडे नशिकसह पुणे आणि धुळ्यात स्थावर व जंगम मालमत्ता असून, याचे मूल्य कोट्यवधींच्या घरात असल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. जमिनी, आलिशान फ्लॅटसचा समावेश आहे. मुंबईतील आर. के. इन्फ्रा. कॉन्स्ट्रो प्रा. लि. या फर्मला हरसूल येथे आदिवासी विकास विभागांतर्गत मुलामुलींच्या वसतिगृहासाठी सेंट्रल किचनचे काम सुरू करण्यासाठी कार्यारंभ आदेश द्यायचा होता.

त्याबदल्यात बागूल यांनी २ कोटी ४० लाख रुपयांच्या कामाच्या रकमेच्या १२ टक्क्यांप्रमाणे २८ लाख ८० हजार रुपये लाच गुरुवारी (ता.२५) रात्री तिडके कॉलनीतील ‘नयनतारा’ या आलिशान सोसायटीतील घरातच तक्रारदाराकडून स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, अपर अधिक्षक नारायण न्याहाळदे यांच्या सूचनेनंतर पथकाने सापळा रचला होता.

कारवाईत भेदरलेल्या बागूलने हातातील एक बॅग फेकून दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेनंतर पथकाने ती बॅग ताब्यात घेतली.त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यात संशयास्पद कागदपत्रे व काही दस्तावेज आढळले. त्याचा तपास केला जात आहे.

Bribe Crime News
Ganeshotsav 2022 : बाप्पाच्या आगमनासाठी प्रशासकीय यंत्रणा सरसावली

फेकलेल्या बॅगेत कागदपत्रे

लाचखोर बागूल याने लाचलुचपत विभागाकडून छापा पडताच फ्लॅटच्या गॅलरीतून खाली एक बॅग केली होती. या बॅगेची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला मिळाली असता, सदरची बॅग पथकाने वॉचमनकडून ताब्यात घेतली. या बॅगेत कागदपत्र आढळून आली असून या कागदपत्रांची तपासणी पथकाकडून केली जात आहेत.

"या कारवाईत बागूल यांच्या नाशिक येथील घरातून ९८ लाख ६३ हजार ५०० रुपये तर पुण्यातील घरातून ४५ लाख रुपये ४० हजार रुपये असे एक कोटी ४३ लाख ६७ हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे. कारवाईत जप्त दस्तावेज व कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. चौकशीतून आणखीही काही माहिती मिळू शकते."

- नारायण न्याहळदे, अपर अधीक्षक, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.

Bribe Crime News
Dinesh Bagul Bribe Case : ‘वरदहस्ता’ मुळे बागूल ‘आदिवासी’त मोकाट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com