Narhari Zirwal
sakal
नाशिक: आदिवासी आश्रमशाळांसाठी खासगी कंपनीमार्फत होत असलेली भरती रद्द करावी, बंजारा व धनगर समाजांचा अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणात समावेश करू नये या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. २६) झालेल्या आदिवासी महापंचायतीत एकूण एक हजार १६५ ठराव प्राप्त झाले आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या पुढाकारातून सकल आदिवासी समाज हे ठराव राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहेत.