''मंदिराची कवाडे उघडा हो''...देवी आईच आम्हाला तारणार...आदिवासी महिलांना मंदिर उघडण्याची आस!

vani.jpg
vani.jpg

नाशिक : (दहीवड) "साहेब, ओ साहेब घ्या ना, घ्या ओटीपूजा घ्या...हार घ्या..!'' अशा आवाजात साधेपणाचा पेहराव, उन्हाने रापलेला चेहरा, अनवाणी पण चेहऱ्यावर मंद स्मितहास्य अशी देहबोली असलेल्या आदिवासी महिला. आपल्या हातात असलेल्या ओटीपूजेच्या साहित्याची सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी नांदुरी येथे देवीभक्तांना विनवणी करत आपल्या हातातील ओटी साहित्याची विक्री करताना नेहमी दिसतात. परंतु हातावरचे पोट असलेल्या या आदिवासी महिलांवर अडीच महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. 

पैशांची येणारी आवक मंदावली

साकोरे, गोबापूर, आठंबे, नांदुरी परिसरात आदिवासी महिलांचा चालता-बोलता व्यवसाय. एरवी भल्या पहाटेपासूनच भाविकांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या घरप्रपंचासाठी झटणाऱ्या या महिलांना लॉकडाउनचा चांगलाच दणका बसला आहे. वणीपासून तर नांदुरी गडापर्यंतच्या प्रवासात अनेक महिला देवीची ओटी भरण्यासाठी लागणारे साहित्य व फुलहार विक्री करून त्यांची गुजराण चालते. मात्र मंदिर बंद असल्याने या महिलांच्या हातातोंडाशी येणारा घास बंद झाला आहे. या महिलांना कुठलेही काम नाही. त्यामुळे पैशांची येणारी आवक पूर्णपणे मंदावली आहे. 

मंदिराची कवाडे उघडण्याची वाट

दैनंदिन खर्चात कुठलीही बचत करता येत नसल्यामुळे या आदिवासी महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्वमालकीची शेती नाही ना दुसरा काही व्यवसाय. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे या महिला रस्त्यावर उभ्या राहून पूजेच्या साहित्याची दिवसभर विक्री करतात. त्यातून जे काही पैसे येतील त्यावर घरखर्च भागवत असतात. आता कधी हाताला काम मिळते, तर कधी घरीच बसून राहावे लागते. त्यामुळे या महिला मंदिराची कवाडे उघडण्याची वाट पाहत आहेत. 

असा अडचणींचा काळ यापूर्वी कधी अनुभवला नाही. या वर्षीचा चैत्रोत्सवही गेला. आमचा सर्व प्रपंच मंदिरात येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे. सध्या मंदिर केव्हा सुरू होईल याकडे लक्ष लागून आहे. कधी एकदा भाविक गडाच्या दिशेने येताना दिसतील असे झाले आहे. - अनुसयाबाई व्यंकट विभूते, ओटीपूजा साहित्य विकणाऱ्या महिला 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com