'आता नदीला पूर, नंतर आसवांचा महापूर!'; आदिवासींची व्यथा

tribals in the western part of trimbakeshwar taluka have to face drought after monsoon floods
tribals in the western part of trimbakeshwar taluka have to face drought after monsoon floods Sakal
Updated on

मूलवड (जि. नाशिक) : त्र्यंबकेश्वर तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा अतिदुर्गम, डोंगराळ असून सीमावर्ती आहे. या परिसरात खरशेत, देवडोंगरा, बोरीपाडा, ओझरखेड, मूलवड या मुख्य गावांसह शंभरावर गावे, पाडे आहेत. संपूर्ण भाग भौगोलिकदृष्ट्य़ा कोकणात येत असल्याने दरवर्षी या भागात पावसाचे प्रमाण जास्त असते. पावसाळ्यात नद्यांना आलेला पूर मात्र येथील नागरिकांची पाण्याची गरज भागवू शकत नाही. हे पाणी अडविण्यासाठी या नद्यांवर अद्याप एकही छोटे धरण बांधण्यात आलेले नाही, त्यामुळे हे पाणी वाहून जाते अन दिवाळीपर्यंत नद्या पुन्हा कोरड्या होतात. नंतर तर पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आसवांचाच पूर येतो. वर्षानुवर्षांचे हे दुष्टचक्र थांबणार कधी असा येथील नागरिकांचा प्रश्न आहे.


सीमावर्ती भागातून दमणगंगा, वाघ नदी या मोठ्या नद्या वाहत असून जवळपास चार महिने दुथडी भरून वाहतात. परंतु राज्य सरकाराने आपल्या वाट्याचे पाणी न अडविल्याने हे सर्व पाणी गुजरातमध्ये वाहून जाते. पावसाळा संपताच या भागातील पाणी पातळी कमी होत जाते. त्यामुळे या भागातील शेती फक्त पावसाळा ते दिवाळी याच कालावधीत बहरते. बाकीचा काळ कोरडा दुष्काळ असतो. या काळात जनावरांना पाणी व चाराही मिळत नाही. उन्हाळ्यात तर पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते. हक्काचे पाणी मिळत नाही, ही खंत मनाशी बाळगत येथील गरीब जनता दिवस काढत आहे

tribals in the western part of trimbakeshwar taluka have to face drought after monsoon floods
नाशिक : रोजच्या पावसामुळे कांदे वाफ्यातच मृत, मकाचेही नुकसान!


वाघ व दमणगंगा या दोन्ही नद्यांवर धरणे बांधली तर परिसरासह नाशिक, मुंबईलाही पाणीपुरवठा होऊ शकतो असे ओझरखेड येथील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. डोंगराळ भाग असल्याने धरण बांधण्यासाठी खर्चही कमी लागेल. त्यामुळे या भागातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांनी शासन दरबारी प्रश्न मांडून सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.

tribals in the western part of trimbakeshwar taluka have to face drought after monsoon floods
श्रीलंका अर्थसंकट : भारतीय कांदा निर्यातदारांचे १२० कोटी अडकले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com