Bachubai Handoge
sakal
नाशिक/घोटी: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव (बरड्याची वाडी) येथे बाळविक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बच्चूबाई हंडोगे या ४५ वर्षीय महिलेने स्वतःला झालेल्या १४ मुलांपैकी सहा बालकांची विक्री केल्याचा संशय व्यक्त होताच परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महिला व बालकल्याण विभाग आणि पोलिस प्रशासनाला तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.