नाशिक- त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी बनावट ऑनलाइन दर्शन पास मिळवून त्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, पाच जणांना अटक केली आहे. संबंधितांनी एक हजार ६४८ बनावट पास काढून पाच हजार नागरिकांना दिल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले. दिलीप नाना झोले, सुदाम राजू बदादे (रा. पेगलवाडी), समाधान झुंबर चोथे, मनोहर मोहन शेवरे (दोघे रा. रोकडवाडी) व शिवराज दिनकर आहेर (रा. निरंजनी आखाड्याजवळ) ही अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.