highway
sakal
नाशिक: सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर-घोटी महामार्गाचे रुंदीकरण प्रस्तावित आहे. प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी (ता. २१) बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रशासन बाधितांच्या पाठिशी असून, भूसंपादनात कोणाचेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. या प्रश्नी सोमवार (ता. २४)पर्यंत योग्य तोडगा काढण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.