Kumbh Mela
sakal
नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळा आराखड्याचे मंगळवारी (ता. २८) मंत्री समितीसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे. साधारणत: १६ हजार कोटींचा हा आराखडा आहे. समितीच्या भूमिकेवर अंतिमत: शिखर समितीची मान्यता अवलंबून असणार आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.