Kumbh Mela
sakal
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात रामतीर्थ परिसरात ५१ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारला जाणार असून, गंगा मंदिराच्या परिसरात ३१ फुटांचा ध्वजस्तंभ असेल. या ध्वजस्तंभाची पायाभरणी अनुक्रमे एक फूट व आठ इंच त्रिज्येची असेल. ध्वजस्तंभाचा पाया साधा ठेवला जाईल, तर सजावटीचे व प्रतीकात्मक काम स्तंभावर करण्याबाबत सर्वानुमते निश्चित केले आहे.