trimbakeshwar Kumbh Mela
sakal
नाशिक: कुंभमेळा प्राधिकरण व त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने शहरातील कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून विविध विभागांच्या एकूण एक हजार ४६१ कोटींची ३० कामे निवडली आहेत. सद्यःस्थितीला त्यातील फक्त चार कामे सुरू झाली असून, उर्वरित कामांना नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये सुरुवात होईल. कामांची गुणवत्ता राखून वेळेत कामे कशी पूर्ण होतील, याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची सूचना कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांना केली.