Nashik News : नाशिक-त्र्यंबक रस्ता रुंदीकरण: 'एनएमआरडीए' च्या पाडकाम नोटिसांमुळे शेतकरी-व्यावसायिक आक्रमक; मुख्यमंत्र्यांची भेट घेणार!

NMRDA Notices on Nashik-Trimbakeshwar Road : नाशिक-त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावर बेळगाव ढगा ते पेगलवाडीदरम्यान 'एनएमआरडीए'ने बेकायदेशीर बांधकामे काढण्यासाठी बजावलेल्या नोटिसांविरोधात आवाज उठवण्यासाठी आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी-व्यावसायिकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईला रवाना
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

sakal 

Updated on

नाशिक: त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील बेळगाव ढगा ते पेगलवाडीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा बांधकामे केलेल्या शेतकरी व व्यावसायिकांना ‘एनएमआरडीए’ने बजावलेल्या नोटिसांची मुदत सोमवारी (ता. १३) संपत आहे. बुधवार (ता. १५)पासून बांधकाम पाडण्यात येणारच, असे एनएमआरडीएने स्पष्ट केल्याने संबंधित व्यावसायिक व शेतकरी आक्रमक झाले आहेत. या कारवाईला स्थगिती देण्यासाठी शेतकरी व्यावसायिकांचे शिष्टमंडळ सोमवारी (ता. १३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com