Jalaj Sharma
sakal
नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी व्यावसायिक व शेतकऱ्यांना बजावलेल्या नोटिसांना तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १०) ‘एनएमआरडीए’च्या कार्यालयावर धडक मारली. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रशासनाने नोटिसा बजावल्याने या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे दिवाळी होईपर्यंत पाडकामास स्थगिती देण्याची मागणी शेतकरी व व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने ‘एनएमआरडीए’चे आयुक्त जलज शर्मा यांच्याकडे केली.