Nashik Accident News : सिन्नर शिर्डी महामार्गवर तिहेरी अपघात; 5 जण जखमी

A triple accident involving a private Aram bus, an Eicher truck and a car
A triple accident involving a private Aram bus, an Eicher truck and a car esakal

Nashik News : सिन्नर शिर्डी महामार्ग असलेल्या शहापूर गावाजवळ शनिवारी सकाळी सहा वाजता तिहेरी अपघात होऊन पाच जण जखमी झाले. शहापूर जवळ झालेल्या अपघातात खाजगी आराम बस चालक यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. (Triple accident in Sinnar Shirdi highway Five people were injured nashik news)

शिर्डी महामार्गावर शहापूर गावालगत शनिवार (दि. १३) पहाटे सहा वाजेदरम्यान खाजगी आराम बस, आयशर ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात पाच जण जखमी झाले आहे. अपघातात आराम बस व टाटा पंच कार या गाड्यांचे नुकसान झाले आहे.

गुजरात येथून खाजगी आराम बस (क्र. Gj १४ V ६६३३) साईंचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना शिर्डी येथे घेऊन जात होते. दरम्यान सिन्नर-शिर्डी महामार्गवर शहापूर गावालगत अचानक एकेरी वाहतूक सुरू झाल्याने बस चालकाचा ताबा सुटला अन पूढे गतिरोधकमुळे स्लो झालेल्या टाटा पंच या कारला पाठीमागून धडक दिली.

सुदैवाने धडकेत कार बाजूला गेली. त्यानंतर बसने आयशर ट्रकलाही पाठीमागून धडक दिली. धडकेत खाजगी बस चालकच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून बसमधील अन्य चार जण किरकोळ जखमी आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A triple accident involving a private Aram bus, an Eicher truck and a car
Nashik Accident: सटाणा-देवळा रस्त्यावर तिहेरी अपघात; ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू, बस व ट्रॅक्टरमधील प्रवासी गंभीर

घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक दुर्गेश शिंदे तसेच स्थानिकांनी अपघातग्रस्तांना बसमधून बाहेर काढले व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे नितीन काकड, गंभीरे यांनी तात्काळ धाव घेत घटनेची माहिती बस चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघताचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

शहापूर गावालगत असणारा उड्डाणपूल उतरत असताना एकेरी वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी गतिरोधक आहे. मात्र सुसाट असणाऱ्या वाहनचालकांच्या गतिरोधक व एकेरी वाहतूक सुरू होत असल्याचे लक्षात येत नसल्याने सदर ठिकाणी वारंवार अपघात घडत असतात.

सदर ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्याचे फलक नसल्याने वाहन चालकांना अचानक वाहनावर ताबा मिळवणे अवघड होत आहे. अपघात झाल्यानंतर तात्काळ राष्ट्रीय प्राधिकरण व खाजगी रुग्णवाहिका यांनी तात्काळ जखमींना उपचारांसाठी हलवले.

सिन्नर शिर्डी मार्ग अतिशय जलद झालेला असल्याने येथे सतत वाहनांची रेलचेल सुरू असते त्यासाठी रस्त्यावर फलक व अत्यावश्यक फलक लावण्यात यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे अनेक ठिकाणी फलक असूनही वाहन चालक दुर्लक्ष करतात त्यामुळे अपघात घडतात.

A triple accident involving a private Aram bus, an Eicher truck and a car
Nashik News : नाशिकमध्ये उष्माघाताचा पहिला बळी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com