Nashik News : कुशलला तिहेरी, स्वराला दुहेरी मुकुट; टेबल टेनिस स्पर्धेत कामगिरी

जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कुशल चोपडाने १७ व १९ वर्षाखालील तसेच पुरुष एकेरीतील विजेतेपदासोबत तिहेरी मुकुट पटकावले.
Narendra Chhajed, Sanjay Modak, Shekhar Bhandari, Milind Kachole, Rajesh Bharvirkar and Abhishek Chhajed along with the winning players.
Narendra Chhajed, Sanjay Modak, Shekhar Bhandari, Milind Kachole, Rajesh Bharvirkar and Abhishek Chhajed along with the winning players.esakal

Nashik News : येथील जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे कै. जितमल छाजेड स्मृतिनिमित्त आयोजित जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कुशल चोपडाने १७ व १९ वर्षाखालील तसेच पुरुष एकेरीतील विजेतेपदासोबत तिहेरी मुकुट पटकावले.

तर स्वरा करमरकर हीने १५ व १७ वर्षाखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळवीत दुहेरी मुकुट पटकावले. (Triple crown for Kushal double crown for Swara in table tennis tournament nashik news)

कुशल चोपडाने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पुनीत देसाईचा ४-१ ने पराभव करून विजेतेपद पटकावले. १९ वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत हर्ष बोथराचा ४-० ने एकतर्फी पराभव करून दुसरे विजेतेपद आपल्या नावे केले. तसेच कुशलने १७ वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत यश भंडारीचा ३-० ने सहज पराभव करून स्पर्धेतील तिसरे विजेतेपद पटकावले.

स्वरा करमरकरने १५ वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम फेरीत जान्हवी कळसेकरचा असा ४-० ने सहज पराभव करून विजेतेपद मिळविले. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात स्वराने जान्हवी कळसेकरचा झालेल्या साखळी स्पर्धेत पराभव करून दुहेरी मुकुट संपादन केला. स्‍पर्धेत यश भंडारीने अंतिम फेरीत १३ वर्षाखालील मुलांच्या गटात आर्य छाजेडचा ३-१ ने पराभव करून विजेतेपद पटकावले.

Narendra Chhajed, Sanjay Modak, Shekhar Bhandari, Milind Kachole, Rajesh Bharvirkar and Abhishek Chhajed along with the winning players.
Nashik News : गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘पंचसूत्री’ मदतगार; पोलिस आयुक्तांची संकल्पना

राघव महालेने ११ वर्षाखालील मुलांच्या एकेरीत ओम रेडेकरचा ३-० ने पराभव करून विजेतेपद पटकावले. किशिता पूरकरने १३ वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम फेरीत शर्वरी कसबेचा २-० ने पराभव करून विजेतेपद पटकावले. अर्चित रहाणेने १५ वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम सामन्यात यश भंडारीचा ४-३ ने पराभव करून अजिंक्यपद मिळविले.

ऑगस्टिन डिमेलो यांनी ४९ वर्षांपुढील पुरुष वेटरन्स स्पर्धेत विजेतेपद मिळविले. प्रणव रावळ यांनी उपविजेतेपद मिळविले. मनमाडच्या सुनील माळोदे यांनी ५९ वर्षांपुढील पुरुष वेटरन्स एकेरीत विजेतेपद पटकावले. सुहास आघारकर यांनी उपविजेतेपद पटकावले. पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, माजी राष्ट्रीय टेबल टेनिसपटू संजय मोडक यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश आटवणे यांनी केले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तनिशा कोटेचा, सायली वाणी, कुशल चोपडा, प्रशिक्षक जय मोडक, राष्ट्रीय शालेय स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या जान्हवी कळसेकर, स्वरा करमरकर, शर्वरी कसबे यांचा नरेंद्र छाजेड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी शेखर भंडारी, मिलिंद कचोळे, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड आदी उपस्थित होते.

Narendra Chhajed, Sanjay Modak, Shekhar Bhandari, Milind Kachole, Rajesh Bharvirkar and Abhishek Chhajed along with the winning players.
Nashik News : उद्या ‘ओमनीकॉन 2024’ परिषद आयोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com