जिल्ह्याचे पालकमंत्री : महाजन यांच्यासह भूसे व विखे- पाटील यांच्यात रस्सीखेच

Radhakrishna vikhe patil, dada bhuse & girish mhajan Latest Marathi news
Radhakrishna vikhe patil, dada bhuse & girish mhajan Latest Marathi newsesakal

नाशिक : उशिराने का होईना मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटप होऊन पालकमंत्री होण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये नाशिक एक आहे. त्यामुळे नाशिकचे पालकत्व सांभाळण्यासाठी गिरीश महाजन यांच्यासह दादा भूसे व राधाकृष्ण विखे- पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.

प्राप्त परिस्थितीत गिरीश महाजन यांचे पारडे जड ठरताना दिसत असून येत्या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. (Tug of war between dada Bhuse Vikhe Patil girish Mahajan for District Guardian Minister nashik Latest Marathi News)

महाविकास आघाडीला धक्का देत, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या चाळीस आमदारांसह स्वतंत्र चूल मांडत भाजपच्या मदतीने सत्ता मिळविली. ३० जूनला शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतरच्या आठ ते दहा दिवसात अन्य आमदारांना मंत्रिपदाची शपथ मिळणे अपेक्षित होते.

परंतु त्यासाठी तब्बल ५० दिवस वाट पहावी लागली. ऑगस्ट क्रांती दिनी १८ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मंत्रिमंडळाची संख्या आता विधिमंडळ अधिवेशनानंतर वाढणार आहे. शपथ दिलेल्या १८ आमदारांमध्ये शिंदे गट व भाजपचे प्रत्येकी ९ आमदार आहेत. या आमदारांमध्ये आता पालकत्वाची स्पर्धा लागली आहे.

उत्तर महाराष्ट्रात महसुली व राजकीयदृष्ट्या नाशिकसह नगर व जळगाव हे तीन जिल्हे महत्त्वाचे आहेत. त्यातही नाशिक जिल्ह्याचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री पद मिळवण्यासाठी देखील स्पर्धा लागली आहे.

वरकरणी पालकमंत्री पदात आपल्याला इंटरेस्ट नाही, असे बोलले जात असले तरी, आतून मात्र जोरदार लॉबिंग सुरू आहे. गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील व दादा भुसे या तिघांमध्ये नाशिकसाठी स्पर्धा आहे.

कही पे निगाहे कही पे निशाणा

दाभाडीचे आमदार दादा भुसे यांना जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याची इच्छा आहे. विशेष करून कसमादे भागावर वर्चस्व निर्माण राहील, अशी व्यवस्था पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून बसविता येईल.

परंतु नाशिकचे विभाजन करून मालेगाव जिल्हा निर्मिती व कसमादे भागाकडील ओढा यामुळे त्यांना पालकमंत्री पद मिळणार नाही, असे बोलले जात आहे. त्या व्यतिरिक्त धुळे लोकसभा मतदार संघात मालेगाव तालुक्याचा समावेश होतो.

Radhakrishna vikhe patil, dada bhuse & girish mhajan Latest Marathi news
NMCच्या अधिकाऱ्यांना स्वदेशी यंत्रावर भरवसा नाय; Make in India भूमिकेला हरताळ

या मतदारसंघावर भाजपची पकड असल्याने पालकमंत्रीपद शिंदे गटाकडे देऊन भाजप आपली पकड ढिली होऊ देणार नाही. त्यामुळे नाशिकच नव्हे तर धुळ्याचे पालकमंत्री पद देखील भुसे यांना मिळणार नाही, असे पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

माजी मंत्री विखे-पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाईल असे बोलले जात असले तरी ती देखील शक्यता जवळपास नाही. त्याला कारण म्हणजे ‘कही पे निगाहे कही पे निशाणा’ प्रमाणे नाशिकचे नाव चर्चेत असले तरी विखे-पाटील यांना नगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदांमध्ये रस आहे.

भौगोलिक दृष्ट्या राज्यात सर्वात मोठा असलेल्या नगर जिल्ह्यावर राजकीय दृष्ट्या पकड मिळविण्यासाठी सध्याचे वातावरण योग्य असल्याने नाशिक पेक्षा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री घेण्याकडे विखे- पाटील यांचा कल आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार आहे. विशेष करून पाचही आमदार शिंदे गटात आहे.

यातील गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद मिळाल्याने जळगाव साठी ते इच्छुक आहेत. पाटील हे जळगाव वर दावा करतील व भाजप व शिंदे गटाचे मधुर संबंध लक्षात घेऊन गिरीश महाजन जळगाव जिल्हा पालकमंत्री पदावर दावा करतील अशी शक्यता दूरवर दिसत नाही. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदावर महाजन यांचा दावा अधिक भक्कम होत आहे.

अनुभव आणि निवडणुका

गिरीश महाजन यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत. राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर दूरध्वनी वरून पूर परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. त्यांच्या धाकाने माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या दौऱ्याला अधिकारी उपस्थित राहिले नाही. त्याचवेळी महाजन नाशिकचे पालकमंत्री बनतील असे बोलले

गेले. येत्या काळात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. सन २०१७ मध्ये गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून होते. परिणामी नाशिक महापालिकेसह नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता आली.

जिल्हा परिषदेत सदस्य संख्या वाढली. त्यामुळे नाशिकचा अनुभव व पुढील निवडणुकीमध्ये पुन्हा सक्षमपणे उभारी घेण्यासाठी गिरीश महाजन यांच्याकडेच पालकमंत्री पदाची धुरा सोपवली जाणार आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात प्रा. देवयानी फरांदे यांची वर्णी लागून महिला व बालकल्याण मंत्री पद मिळेल असे बोलले गेले. परंतु मंत्र्यांच्या पहिल्या यादीत फरांदे यांचे नाव आले नाही. पहिल्या यादीत फरांदे यांना मंत्रिपद मिळाले असते तर जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांच्याकडे गेले असते. त्यामुळे तूर्त महाजन यांच्याकडेच पालकमंत्री पद राहील यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

Radhakrishna vikhe patil, dada bhuse & girish mhajan Latest Marathi news
विद्यार्थ्यांकडून प्राचीन वटवृक्षाला 25 फुटाची राखी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com