Dhule Balaji Sweets expired food inspection
esakal
धुळे : येथील अन्न व औषध प्रशासनाने शहरातील श्री दत्त मंदिर चौक परिसरातील एस बालाजी स्वीट्सची मंगळवारी (ता. १४) अनपेक्षित तपासणी केली. यादरम्यान आढळलेल्या गंभीर त्रुटी आणि अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या दुकानाचा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ निलंबित (Food license suspended in Dhule sweet shop) केला. अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त गो. वि. माहोरे यांनी तरतुदींनुसार या निलंबनाचे आदेश काढले असून, या धडक कारवाईमुळे स्थानिक अन्न व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.