Nashik News : जिल्ह्याला कोव्हिशील्डचे 25 हजार डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination News

Nashik News : जिल्ह्याला कोव्हिशील्डचे 25 हजार डोस

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण वाढविण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने काढले होते. लसीकरणासाठी जिल्ह्यात कोव्हिशील्ड लस उपलब्ध नसल्याने लसीकरण संथगतीने सुरू होते.

मात्र, राज्य शासनाकडून नाशिक जिल्ह्यासाठी कोव्हिशील्ड लशींचा पुरवठा झाला आहे. पहिल्या टप्प्यात २५ हजार डोस प्राप्त झाले आहेत. या प्राप्त डोसचे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केद्र, उपकेंद्रावर वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून लसीकरणाला वेग आला आहे. (Twenty Five Thousand doses of Covishield to district Increase in Corona Vaccination at Primary Health Center Nashik News)

हेही वाचा: Nashik News : विनयनगरच्या वादग्रस्त भूखंडावरील अतिक्रमण हटविणार

चीनप्रमाणेच जगातील अन्य देशातही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारने गर्दीच्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणे लसीकरण वाढविण्याबाबत सूचित केले आहे. केंद्रापाठोपाठ राज्याच्या आरोग्य विभागाने नाशिक जिल्हा आरोग्य विभागाला कोरोनाच्या उपाययोजनांची अंमलबाजणी करण्याबाबत सूचना केल्या.

त्यानुसार जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाने लसीकरण वाढविणे, केंद्रावरील तपासण्या वाढविणे, विलगीकरण कक्ष तयार करणे आदी उपाययोजना सुरू केल्या. ही तयारी सुरू असली तरी, लसीकरणासाठी जिल्हाभरात कोव्हिशील्ड लशींचा पुरेसा साठा उपलब्ध नव्हता.

त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावर मर्यादित २५ ते ५० लसीकरण सुरू होते. लस उपलब्ध नसल्याने अनेकांना घरी परतावे लागत होते. परंतु जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोव्हिशील्ड लशींची राज्य आरोग्य विभागाकडे मागणी नोंदविली.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Nashik News : पहिल्या टप्प्यात 57 ठिकाणी चार्जिंग स्टेशन; 35 ठिकाणी निधी उपलब्ध होणार

ही मागणी नोंदविल्यानंतर १५ दिवसांनी म्हणजे गत आठवड्यात लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. पहिल्या टप्प्यात २५ हजार लशींचा साठा प्राप्त झाला आहे. प्राप्त झालेल्या लशींचे वितरण करण्यात आले असून, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावर लसीकरण सुरू झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यातील साठादेखील लवकरत उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

एकाच दिवशी ५०० लसीकरण

लससाठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणास वेग आला आहे. शुक्रवारी (ता. २०) एका दिवसात ग्रामीण भागात ४८८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात नाशिक ग्रामीणमध्ये ३४६ तर, नाशिक महापालिका क्षेत्रात ९६ आणि मालेगाव महापलिका क्षेत्रात ४६ डोस देण्यात आले.

दृष्टिक्षेपात लसीकरण

- पहिला डोस घेतलेले ः ५१ लाख ५५ हजार ३१७

- दुसरा डोस घेतलेले ः ४५ लाख ७९ हजार ८७

- सावधगिरीचा डोस घेतलेले ः ५ लाख ४१ हजार ८८३

हेही वाचा: Jalgaon News : कर्ज देण्याच्या आमिषाने तरुणाची तब्बल 7 लाख 60 हजारांत फसवणूक