esakal | २३ भाजप उद्योग आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; भाजपला जोरदार दणका 
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena 1234.png

पक्षातून गेलेल्यांची घरवापसी भाजपने सुरू केल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने भाजप संघटनेला पोखरण्याचे काम सुरू केले आहे.

२३ भाजप उद्योग आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; भाजपला जोरदार दणका 

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : पक्षातून गेलेल्यांची घरवापसी भाजपने सुरू केल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने भाजप संघटनेला पोखरण्याचे काम सुरू केले आहे. भाजपच्या उद्योग आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. २२) शिवसेना भवन येथे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने भाजपला जोरदार दणका दिला आहे.

हेही वाचा >> डॉक्टरांचे ऐकले असते तर आज 'त्यांचे' प्राण वाचले असते! परिसरात हळहळ

जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, ज्येष्ठ नेते राजू लवटे आदी उपस्थित होते. सातपूर विभागातील समाधान देवरे, मीनानाथ गाडे, संदीप भामरे, बाळासाहेब शिंदे, कारभारी म्हस्के, आबाजी जाधव आदींसह २३ पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.  

हेही वाचा >> पित्याच्या सांगण्यावरून अखेर घटनेचा ११२ दिवसांनी उलगडा; धक्कादायक माहिती समोर

loading image