esakal | वजन २.५ किलो अन् वय साडेतीन महिनेच.. चिमुकल्याची सहनशक्तीची अन् डॉक्टरांची कमाल!

बोलून बातमी शोधा

three months baby.jpg

वेदांत तीन महिन्यांचा असताना आजाराचे निदान झाले. वय तीन महिने व वजन 2.5 किलो. इतक्‍या कमी वजनाच्या बाळात या आजाराची ओपन हार्ट सर्जरी केली जाते. मुंबई, दिल्ली, कोलकता यासारख्या शहरांमध्ये अतिप्रगत रुग्णालयांत डिवाईस तंत्राद्वारे म्हणजे मांडीच्या रक्तवाहिनीतून हृदयापर्यंत पोचून ही अतिरिक्त रक्तवाहिनी बंद केली जाते. त्या पद्धतीने उत्तर महाराष्ट्रातील पहिले बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. ललित लवणकर यांनी व त्यांच्या चमूंनी हे आवाहन स्वीकारले.

वजन २.५ किलो अन् वय साडेतीन महिनेच.. चिमुकल्याची सहनशक्तीची अन् डॉक्टरांची कमाल!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अवघ्या साडेतीन महिन्यांच्या व अडीच किलो वजन असलेल्या बालकाच्या हृदयाला अतिरिक्‍त रक्‍तवाहिनी असल्याचे निदर्शनास आले. बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. ललित लवणकर यांनी ओपन हार्ट शस्त्रक्रिया न करता डिवाईस तंत्रज्ञानाने यशस्वी उपचार केले. या संदर्भातील माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

हृदयातील अतिरिक्त रक्तवाहिनी डिवाईस तंत्राने बंद 

नाशिकमधील दैतकर कुटुंबीयांचा वेदांत अवघ्या दोन महिन्यांचा असतांना त्याला न्यूमोनिया झाला. रुग्णालयात भरती केल्यानंतर डॉक्‍टरांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर तो बचावला. घरी गेल्यानंतर वारंवार खोकला, ताप, दूध व्यवस्थित न पिण्याने त्याचे वजन कमी होत होते. देवळ्यातील डॉ. देवेंद्र चव्हाण यांना बाळास काहीतरी त्रास असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी टुडीइको करण्याचा सल्ला दिला. वेदांत तीन महिन्यांचा असताना आजाराचे निदान झाले. वय तीन महिने व वजन 2.5 किलो. इतक्‍या कमी वजनाच्या बाळात या आजाराची ओपन हार्ट सर्जरी केली जाते. मुंबई, दिल्ली, कोलकता यासारख्या शहरांमध्ये अतिप्रगत रुग्णालयांत डिवाईस तंत्राद्वारे म्हणजे मांडीच्या रक्तवाहिनीतून हृदयापर्यंत पोचून ही अतिरिक्त रक्तवाहिनी बंद केली जाते. त्या पद्धतीने उत्तर महाराष्ट्रातील पहिले बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. ललित लवणकर यांनी व त्यांच्या चमूंनी हे आवाहन स्वीकारले.

हेही वाचा > पैजेच्या नादात जीवाभावाच्या मित्रांची कायमचीच ताटातूट..! धक्कादायक घटना 

अत्यंत अवघड व किचकट शस्त्रक्रिया पायोनिअर हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पाडली. यानंतर 48 तासांत बाळास घरी पाठवण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ डॉ संघर्ष मोरे व हृदयरोगतज्ज्ञ डॉ नीलेश पुरकर यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रिया होऊन दोन आठवड्यांच्या वर काळ लोटला आहे. वेदांत अगदी निरोगी आहे व आता त्याचे वजन तीन किलो 100 ग्रॅम इतके आहे. 

हेही वाचा > काळापुढे आईचे प्रयत्नही हरले!...ह्रदयद्रावक घटना