esakal | सराईत गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

arrested2.jpg

८ नोव्हेंबरला शेख आजीम शेख बादशाह (वय ४०, रा. टाकळीगाव, ता. खुलताबाद) हा त्याच्या तीन साथीदारांसह नाशिक येथील फ्रूट मार्केटमध्ये संत्री विकण्यासाठी आला होता. त्यानंतर दोन दिवस ते सिन्नर येथे मुक्कामी थांबले होते.

सराईत गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सिन्नर (नाशिक) : १० नोव्हेंबरच्या मध्यरात्री शहरातील उद्योगभवन व संगमनेर नाका परिसरातील ट्रान्स्पोर्ट कंपनीचे गुदाम व बॅटरीचे बंद दुकान फोडून चोरट्यांनी सव्वानऊ लाख रुपये किमतीचे साहित्य लांबविले होते. या घटनेतील संशयिताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबाद येथे अटक केली असून, त्यांच्याकडून साडेदहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुदाम, बॅटरीचे दुकान फोडणारे दोघे अटकेत

८ नोव्हेंबरला शेख आजीम शेख बादशाह (वय ४०, रा. टाकळीगाव, ता. खुलताबाद) हा त्याच्या तीन साथीदारांसह नाशिक येथील फ्रूट मार्केटमध्ये संत्री विकण्यासाठी आला होता. त्यानंतर दोन दिवस ते सिन्नर येथे मुक्कामी थांबले होते. यादरम्यान त्यांनी शहर परिसरातील विविध दुकानांवर पाळत ठेवली होती. १० नोव्हेंबरला त्यांनी उद्योगभवन परिसरातील अविनाश कार्गो या ट्रान्स्पोर्ट कंपनीचे गुदाम व संगमनेर नाका परिसरातील न्यू इंडिया ऑटो एलेक्ट्रिकल ॲन्ड बॅटरी या बंद दुकानाचे शटर वाकवून कंपनीचे व वाहनांचे इलेक्ट्रिक साहित्य, लोखंडी मोटारपंप, इलेक्ट्रिक मोटार, ग्राइंडर, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या बॅटरी असा नऊ लाख २६ हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

10 लाख ५२ हजार ९९७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबाद येथील टाकळी परिसरातून शेख आजिम यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने औरंगाबाद व जालना येथील आणखी तीन सहकाऱ्यांसमवेत सिन्नर येथील चोरी केल्याची कबुली दिली. चोरीस गेलेला मुद्देमाल वाजिद रफिक चौधरी (२५, रा. वाळुजगाव) यांच्या साहिल एन्टरप्राइजेस या भंगार दुकानांतून जप्त करत गुन्ह्यात वापरलेला आयशर टेम्पो (एमएच २०, सीटी २६२१) सह सर्व दहा लाख ५२ हजार ९९७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

संशयित सराईत गुन्हेगार असून, राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. संशयित आजिम शेख व त्याचे साथीदार हे आंतर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक अनिल वाघ, पोलिस नाईक प्रीतम लोखंडे, प्रवीण सानप, नीलेश कातकाडे, हेमंत गिलबिले यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

loading image
go to top