100 फूट दरीत पडलेल्या महिलेसाठी दोघे डॉक्टर देवदूत

पेठ रोडवरील चामरलेणी डोंगरावर फिरणाऱ्यास गेलेली महिला पाय घसरून थेट १०० फूट खोल दरीत पडली.
Doctor
Doctorsakal

नाशिक : पेठ रोडवरील चामरलेणी डोंगरावर फिरणाऱ्यास गेलेली महिला पाय घसरून थेट १०० फूट खोल दरीत पडली. सुदैवाने त्यावेळी फिरण्यासाठीच आलेल्या दोघा डॉक्टरांनी धोका पत्करून गंभीर जखमी महिलेवर जागेवर प्राथमिक उपचार करून नागरिकांच्या मदतीने वर आणले आणि रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल केले. वेळेत दोन्ही डॉक्टरांनी मदत केल्याने या महिलेचे प्राण वाचले.

पेठ रोडवरील चामरलेणी येथे पहाटेपासूनच फिरायला जाणाऱ्यांची गर्दी असते. रविवार असल्याने गर्दी अधिक असते. याठिकाणी फिरायला येणारे अनेक जण चामरलेणी डोंगराच्या पायऱ्या चढून लेणीपर्यंत जातात, तर काही जण अर्ध्या वाटेवर जाऊन डोंगरांभोवती असलेल्या पायवाटेने गोल चक्कर मारतात. ही पायवाट काहीशी अरुंद असून, या पायवाटे भोवती खोलदरीही आहे. त्यामुळे थोडा निष्काळजीपणा झाला, तर पाय घसरून खोलदरीवरून खाली जाण्याची आणि जीवावर बेतण्याचीच शक्यता असते.

Doctor
राहुलने 19 तासांत सायकलवर कापले 300 किलोमीटर अंतर

डॉक्टरांची तत्परता

रविवारी (ता. १९) सकाळी एक महिला याच पायवाटेने जात असताना, त्यांचा एका वळणावर पाय घसरला आणि त्या सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळल्या. या वेळी त्यांच्यसोबत असलेल्या व्यक्तीला काय करावे अन्‌ काय नाही, असे झाले. त्याचवेळी डॉ. रवीकिरण निकम व डॉ. गणेश शिंदे हे दोघेही त्याच वाटेने फिरत असताना, महिलेसोबतच्या व्यक्तीने घडलेली घटना सांगितली. त्यावेळी डॉ. निकम व डॉ. शिंदे यांनी प्रसगांवधान दाखवित ते धोका पत्करून त्या खोलदरीत उतरले. महिला उंचावरून पडल्याने त्यांना गंभीर मार लागला होता. तसेच त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. दोघांनी महिलेवर जागेवरच प्राथमिक उपचार करून त्यांना शुद्धीवर आणले. तसेच तेथे जमा झालेल्या नागरिकांच्या मदतीने त्या महिलेस दरीतून वर आणले आणि संपर्क साधून घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावून, त्यातून त्यांना खासगी रुग्णालयात रवाना केले. डॉ. निकम व डॉ. शिंदे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्या महिलेचे प्राण वाचले. यामुळे उपस्थित नागरिकांनी देवदूतासारखेच कार्य त्यांनी केल्याने त्यांचे कौतुकही केले.

Doctor
SSC Result : शालेय शुल्काअभावी नापास केलेल्या ओमची यशाला गवसणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com