

नाशिक / निफाड : मंगळवारी पहाटेच्या सुमारास दोन्ही दुकानांतुन आगीचे लोळ बाहेर पडताना दिसल्यावर नागरिकांनी आरडाओरडा करुन ग्रामस्थांना जागे केले. पहाटे तीन वाजेच्या सुमारास या व्यापारी संकुलातील इतर दुकानदारही भीतीने गोळा झाले.
अशी घडली घटना
उगांव येथील धर्मवीर संभाजी राजे व्यापारी संकुलात तळमजल्यावर समाधान पानगव्हाणे यांचे श्रीराम हार्डवेअर व रमेश ढोमसे यांचे निर्मल कृषी मंदिर हे दुकान आहे. या मंगळवारी पहाटेच्या सुमारास दोन्ही दुकानांतुन आगीचे लोळ बाहेर पडताना दिसल्यावर नागरिकांनी आरडाओरडा करुन ग्रामस्थांना जागे केले. पहाटे तीन वाजेच्या सुमारास या व्यापारी संकुलातील इतर दुकानदारही भीतीने गोळा झाले. नागरिकांनी उपलब्ध साधनांनी आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने पिंपळगाव बसवंत येथील अग्नीशमन वाहनाने दाखल होऊन सकाळी सहावाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले.
या वस्तू भस्मसात
आगीत समाधान पानगव्हाणे यांच्या श्रीराम हार्डवेयरमधील पि व्हि सी साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तु, पाईप, सुतळी व कृषीपुरक वस्तु आणि इतर साहित्य मिळुन ऐंशी लाख रूपयांची वित्तहानी झाली. तर रमेश ढोमसे यांच्या निर्मल कृषी मंदिर या दुकानाचे फर्निचर, रासायनिक खते, किटकनाशके, बुरशीनाशके, बियाणे, एल ई डी व सिसिटिव्ही मिळुन सहासष्ट लाख रूपयांची वित्तहानी झाली. अशाप्रकारे दोन्ही दुकानांचे मिळून एकुण एक कोटी शेहेचाळीस लाखांची वित्तहानी झाली आहे.
दुकाने फोडण्याचाही प्रयत्न
सकाळी व्यापारी संकुलाबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिस उपाधिक्षक माधव रेड्डी, पोलिस निरिक्षक आर बी सानप, मंडळ अधिकारी कुयटे, तलाठी आर बी गायकावाड आदींनी या ठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. घटनास्थळावर श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. आगीच्या घटनेबरोबरच व्यापारी संकुलासमोर असलेल्या दोन दुकानांना फोडण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
समाधान पानगव्हाणे यांच्या फिर्यादीवरुन निफाड पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच तपास यंत्रणेने या गुन्ह्याच्या तपासात बाळा भास्कर गांगुर्डे (रा. उगाव) व जयेश एकनाथ ठेंगे (रा. निमगाव वाकडा) या संशयितांना अटक केली आहे.
भिंतीला छिद्र पाडून त्यांनी केले असे काही
उगाव, ता. निफाड येथील धर्मवीर संभाजी राजे व्यापारी संकुलातील दोन दुकानांना मंगळवारी (ता. 30) पहाटेच्या सुमारास आगीने आपल्या कवेत घेतले. यामुळे सुमारे दीड कोटी रूपयांचे नुकसान झाले असून दुकानांच्या भींतीला छिद्र पाडुन आग लावल्याची शक्यता वर्तवली गेल्याने अवघ्या पाच तासांत पोलिसांनी या घटनेचा तपास करत छडा लावून दोन संशयितांना अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.